नांदेड विभागातून एप्रिलमधून सहा रेल्वे गाड्या सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:19 AM2021-02-24T04:19:51+5:302021-02-24T04:19:51+5:30

नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी २ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल. औरंगाबाद ते नांदेड ...

Six trains will start running from Nanded division from April | नांदेड विभागातून एप्रिलमधून सहा रेल्वे गाड्या सुरू होणार

नांदेड विभागातून एप्रिलमधून सहा रेल्वे गाड्या सुरू होणार

Next

नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी २ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल. औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी ५ एप्रिलपासून रात्री १वाजून५ मिनिटाला सुटेल. औरंगाबाद ते रेणीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस २ एप्रिलपासून दर शुक्रवारी औरंगाबाद येथून रात्री ८ वाजून ५० मिनिटाला सुटेल. रेणीगुंटा-औरंगाबाद ही साप्ताहिक एक्स्प्रेस दर शनिवारी ३ एप्रिलपासून रेणीगुंटा येथून रात्री ९.२५ मिनिटाला सुटेल. नांदेड ते संत्रागच्ची ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल. संत्रागच्ची ते नांदेड ही साप्ताहिक एक्सप्रेस दर बुधवारी ७ एप्रिलपासून संत्रागच्ची येथून दुपारी २ वाजून ४५ मिनिटाला सुटेल. नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दर गुरुवारी १ एप्रिलपासून नांदेड येेथून सकाळी ६.५० वाजता सुटेल. तर श्री गंगानगर ते नांदेड ही विशेष साप्ताहिक एक्सप्रेस दर शनिवारी ३ एप्रिलपासून गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटणार आहे.

Web Title: Six trains will start running from Nanded division from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.