शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 16:31 IST2023-07-02T16:26:46+5:302023-07-02T16:31:39+5:30

सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप.

Shiv Sena and Congress will continue to be together in MahaVikasAghadi - Ashok Chavan | शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

नांदेड : राज्यातील सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. याचा अर्थच राज्यातील सध्याचे सरकार स्थिर नाही. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना फोडाफोडी करून आणावे लागत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला.

राज्यातील रविवारच्या राजकीय भूकंपावर चव्हाण म्हणाले, सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सरकार वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १६ आमदार अपात्र ठरतील का, या विषयावर काही सांगता येत नाही. माझे थोड्या वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांना मी सांगितले, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत यापुढेही एकत्र राहतील, एकत्र निवडणुका लढवतील.

राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. त्यांच्याशी अजून बोलणे झाले नसून त्यांना थोडा वेळ लागेल, असेही चव्हाण म्हणाले. तसेच नांदेड जिल्ह्यात लाेकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून विधानसभानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Shiv Sena and Congress will continue to be together in MahaVikasAghadi - Ashok Chavan