शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

रबी हंगाम होणार सुखाचा; अप्पर मानार लिंबोटीची शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 3:05 PM

कंधार -लोहा तालुक्यातील ६ हजार हेक्टरला होणार फायदा

ठळक मुद्देलिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे.शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर 

कंधार (जि. नांदेड) : कंधार व लोहा तालुक्यातील रबी हंगामाचा शिवार हिरवा होण्यास अप्पर मानार लिंबोटी प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. लोहा येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय झाला असून, याचा  या दोन तालुक्यातील ६ हजार हेक्टरवरील शेतीला फायदा होणार आहे. 

अप्पर मानार प्रकल्प निर्माण करण्यामागे हरित शेतीची संकल्पना होती. परंतु शेतीपेक्षा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला. त्यातूनच शेजारच्या तालुक्यापेक्षा दूरच्या तालुक्यात पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून संघर्ष उभा राहू लागला. उदगीर शहराला व पालमसह अनेक गावांना या  प्रकल्पातील पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेत नाराजी आहे. लिंबोटी प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.  

या बैठकीत रबी हंगामाकरिता ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ३० गावातील ६ हजार हे.शेती सिंचनासाठी फायद होतो. यंदा प्रकल्प तुडुंब आहे. त्यामुळे कंधार तालुक्यातील बोरी, घोडज, गंगनबीड, बाबुळगाव, बाळांतवाडी, पानभोसी, चिखलभोसी या ७ गावांना तर  लोहा तालुक्यातील २३ गावाची रबीची शेती बहरण्यासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. पहिले पाणी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवडयात देण्यात येणार आहे.त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ६ हजार हेक्टर जमिन रबी हंगामाने बहरणार आहे.याचा लाभ दोन्ही तालुक्यातील ३० गावांना होणार आहे. पाण्याची स्थिती पाहून उपलब्ध जलसाठा यावरून उन्हाळी हंगाम पाण्याचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

बारूळ प्रकल्पातील आवर्तन कधी?निम्न मानार प्रकल्प बारूळची पाणी साठवण क्षमता  १४६.९२ दलघमी आहे. कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यातील ९९ गावांतील २३ हजार ३१० हेक्टर शेती सिंचन या प्रकल्पामुळे होते. कंधार तालुक्यातील ३८ गावे, बिलोली १२ व नायगावमधील ४९ गावांतील शेतीला याचा फायदा होतो; परंतु अद्याप कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे पाणी कधी मिळणार, हा प्रश्र आहे. 

शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर ५८ कि.मी. डाव्या कालव्यातून पाणी लोहा व कंधार तालुक्यांतील  ३० गावांना दिले जाते. त्यात शेलगाव वितरिकेचे चाचणीचे काम होणे गरजेचे होते. याची चाचणी डिसेंबरअखेर होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचे समजते. 

टॅग्स :DamधरणNandedनांदेडWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती