शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:48 IST

पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांची उदासिनता पेरणीपूर्व पीककर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना ठरेल लाभदायी

श्रीनिवास भोसले।नांदेड : पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ परंतु, शेतक-यांकडे बँक अधिका-यांचा पाहण्याचा दृष्टीकोण आणि उदासिनतेमुळे उद्दिष्ट देवूनही शेतक-यांना कर्ज मिळत नाही़ यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत केवळ १़६३ टक्केच कर्जवाटप झाले आहे़शासनाच्यावतीने शेतक-यांना खरीप, रबी हंगामात पेरणीसाठी लागणारे खत-बी बियाणे खरेदीसाठी पीककर्ज उपबल्ध करून दिले जाते़ परंतू, नांदेड जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गरज असतांनादेखील शेतकºयांना कर्ज मिळत नाही़ गतवर्षी जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बँकानी कर्जवाटपाची गती वाढविली होती़ परंतु, पेरणी करण्यापूर्वीच पीककर्ज उपलब्ध झाले तर त्यांचा शेतक-यांना योग्य फायदा होतो़ परंतु, बँकाच्या दिरंगाईचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो़ बँकाकडे अर्ज करून तसेच बँक अधिका-यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनदेखील कर्जासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागतात़ ही परिस्थिती बदलली आणि बँकामधील एजंटांवर अंंकुश मिळविण्यात प्रशासनास यश आले तरच सर्वसामान्य शेतक-यांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होवू शकते़नांदेड जिल्ह्याला यंदाच्या २०१९ - २० खरीप हंगामासाठी १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार रूपये पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक १५११ कोटी ७३ लाख ७४ हजार रूपये उद्दिष्ट व्यापारी आणि खासगी बँकांना दिले आहे़ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १७८ कोटी ६० लाख ४० हजार रूपये तर ग्रामीण बँकेस २७७ कोटी १६ लाख ८३ हजार रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये पीककर्ज २ हजार ६३८ शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे़ त्याची टक्केवारी ६़३४ एवढी आहे़आजपर्यंत साडेचार हजार शेतक-यांना लाभजिल्ह्यातील बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट असूनही पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याचे पहाला मिळत आहे़ आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५८३ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३८ शेतकरी सभासद हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत़ तर १ हजार ९७ शेतक-यांना व्यापारी आणि खासगी बँकानी आणि ग्रामीण बँकेने ८४८ शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे़ खासगी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत़पीककर्ज हे पेरणीसाठी दिले जाते़ त्यामुळे पीककर्ज वाटप १५ जूनपर्यंत पूर्ण करायला हवे़ परंतु, बँकाकडून दिरंगाई केली जाते़ त्यामुळे पेरणी काळात शेतक-यांना सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरीMONEYपैसा