शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांचा आकडा ४००

By admin | Updated: May 14, 2014 01:14 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील चालू ३३४ अंगणवाड्यांतील २५ हजार बालकांपैकी ३८२ विद्यार्थी नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित होते.

 सुनील चौरे,   हदगाव तालुक्यातील चालू ३३४ अंगणवाड्यांतील २५ हजार बालकांपैकी ३८२ विद्यार्थी नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित होते. हा आकडा कमी होण्याऐवजी पाच महिन्यांत या आकड्यात १८ बालकांची वाढ झाली आहे. याविषयी संबंधित खाते अनभिज्ञ आहे. तालुक्यातील २८२ अंगणवाडी व ८२ मिनी अंगणवाडीमध्ये २५ हजार विद्यार्थी शालेय शिक्षणापूर्वीचे धडे गिरवितात. २०१३ मध्ये कुपोषणमुक्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याला भरपूर यश मिळाले परंतु जानेवारीपासून हे अभियान थंड पडले व कुपोषित बालकाची संख्या अभियानात झपाट्याने कमी झाली. तशीच अभियान बंद होताच झपाट्याने वाढली. कुपोषणमुक्तीसाठी पंचसूत्री अंमलात आणली होती. महिन्यापर्यंत केवळ स्तनपानाच प्रमाण ८० टक्यापर्यंत वाढविणे, ६ महिने ते २४ महिने वयोगटात आईच्या स्तनपानासोबत बालकांच्या आहारातील विविधता व गुणवता वाढविणे. मुलीमधील रक्ताक्षयाचे प्रमाण ५० टक्यांनी कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणे, बालकाच्या जन्मानंतर तत्काळ स्तनपानास सुरुवात आणि सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानाचे प्रमाण ८० टक्यापर्यंत वाढविणे व अति कुपोषित सर्व बालकांना उपचारात्मक आहाराचे व्यवस्थापन तसेच विशिष्ट उपचाराच्या माध्यमाचे व्यवस्थापन करणे.या पंचसूत्री प्रमाणे कुपोषणमुक्ती अभियान राबविले गेले. नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित बालकाची एकूण संख्या २०५९ एवढी होती. कमी वजनाचे बालके एवढी होती तर तीव्र कुपोषित ३८२ बालके होते. ही संख्या पुन्हा घटायला पाहिजे होती. परंतु ती वाढली (४००) आहे. याचे प्रमुख कारण अंगणवाडीताईचा संप त्यानंतर नवीन अंगणवाडी भरती व नंतर लोकसभा निवडणूक यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. निमगाव प्राथमिक केंद्रांतर्गत सावरगाव (माळ) या एका गावात २५ बालके आहेत. पूर्वी ही संख्या १८ ते २० वर होती. याविषयी पर्यवेक्षिका जे. डी. केंद्रे यांना विचारपूस केली असता उन्हामुळे बालकाचे वजन कमी होते. उन्हाळ्यात बालके पोषक आहार घेत नाहीत. पिण्याचे पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेही कुपोषण वाढते. उन्हाळा संपताच हा आकडा खाली येईल परंतु मध्यंतरी या बालकांच्या जीवनाला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालक करीत आहेत.