शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

नांदेड जिल्ह्यात हमीभावासाठी आता व्यापारी रडारवर;बाजार समितीने पाठवल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:25 IST

नाफेडने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणा-या व्यापा-यांना बाजार समितीकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत़ नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने आतापर्यंत २० व्यापा-यांना नोटिसा पाठविल्या आहेत़

ठळक मुद्देतूर खरेदीसाठी सहा केंद्र : हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचे प्रकार

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नाफेडने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणा-या व्यापा-यांना बाजार समितीकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत़ नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने आतापर्यंत २० व्यापा-यांना नोटिसा पाठविल्या आहेत़शासनाने तूर आणि हरभरा खरेदीसाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केले जात आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत मुखेड, नांदेड-अर्धापूर, देगलूर, नायगाव, बिलोली, लोहा या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ तर लवकरच किनवट, भोकर आणि हदगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग आॅफिसर रामप्रसाद दांड यांनी सांगितले़ तूर विक्रीसाठी पीकपेरा नोंद असलेला सातबारा, आधार आणि बँक पासबुकची झेरॉक्स देवून नोंदणी करावी लागत आहे़ नोंदणी केलेल्या शेतक-यांना मॅसेज पाठवून तूर विक्रीसाठी घेवून येण्याचे आवाहन केले जात आहे़शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आॅनलाईन पद्धतीमुळे शेतक-यांच्या अडचणी वाढत आहेत़ तर हेक्टरी केवळ १२ क्विंटलची मर्यादा दिली असल्याने निव्वळ तुरीचे उत्पादन घेण्या-या शेतक-यांसमोर हमीभाव मिळविण्याचे संकट उभे राहत आहे़ शासनाकडून सध्या बोनससह प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रूपये भाव दिला जात आहे़ नाफेडमार्फत ३ हजार ५० रूपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची खरेदी केली़ खासगी बाजारपेठेतदेखील कमीच भाव होता़ परंतु, आज व्यापाºयांकडून ४ हजार ते ४२०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची खरेदी केली जात आहे़ यामध्ये व्यापा-यांचीच चांदी होणार हे निश्चित आहे़ कोणतीही नोंदणी न करता तूर विक्री केली की लगेच पैसे मिळत असल्याने शेतकरीदेखील खाजगी व्यापाºयांकडेच तूर, चणा विक्री करीत असल्याचे चित्र आहे.बाजार समितीकडून २० व्यापा-यांना नोटिसानांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणा-या जवळपास वीस व्यापा-यांना नोटिसा बजावल्या आहेत़ शेतक-यांनी हमीभावापेक्षा कमी दराने आपला माल विकू नये तसेच व्यापा-यांनीदेखील हमीभाव देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती बी़ आऱ कदम यांनी सांगितले़तालुका कृषी अधिकारी, तालुका उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या परवानगीशिवाय नॉन एफएक्यू दर्जाचा माल विक्री व खरेदी केला जाऊ नये, असे आवाहन सचिव हरिश्चंद्र देशमुख यांनी केले़ हमीभावापेक्षा कमी भावाने तूर, चणा खरेदी करणा-या व्यापा-यांना नोटिसा देवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले़ शेतक-यांनीदेखील हमीभाव खरेदी केंद्रावरच आपला माल विकून शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़