नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 21:49 IST2025-11-08T21:48:16+5:302025-11-08T21:49:47+5:30
नांदेडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
नांदेड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मुखेडमध्ये ६ वर्षीय चिमुरडीवर २२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली आहे.
दरम्यान, या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी (७ नोव्हेंबर रोजी ) ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पिडीत मुलगी घराजवळच असलेल्या खासगी शिकवणीवरुन घरी परतत होती. यावेळी वाटेतच आरोपीने लैंगिक अत्याचार केले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली. यावर पोलिसांनीही हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.