शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड ‘मनपा’त पुन्हा खांदेपालट; बदल्यांचा हंगाम सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 19:23 IST

पात्रतेकडे कानाडोळा करून पदभाराचंी खैरात

ठळक मुद्देशासन नियुक्तीस विलंब

नांदेड : महापालिकेत पुन्हा एकदा बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून अतिरिक्त पदभारांची खैरात वाटप केली जात आहे. ११ डिसेंबर रोजी सहा बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.

भांडार अधीक्षक असलेल्या सध्या तरोडा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार असलेल्या विलास मठपल्लेवार यांचा पदभार काढून पुन्हा एकदा त्यांना भांडार अधीक्षक पदी नेमले आहे. क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे गौतम कवडे यांना पुन्हा एकदा आयुक्तांचे स्वीय सहायक म्हणून घेण्यात आले आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकाम विभागाचे ते प्रभारी सहायक आयुक्त म्हणूनही काम पाहणार आहेत. मुळचे वरिष्ठ लिपिक असलेले मल्हार मोरे यांना शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला होता. तो बदलून आत अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून नेमले आहे. उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना तरोडा, सांगवी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुळचे जकात अधीक्षक असलेले संभाजी कास्टेवाड यांना अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक दिली आहे.  प्रभारी मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या राजेश चव्हाण यांना आता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे तर त्यांच्याकडील मालमत्ता व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा उपायुक्त अजितपाल संधू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या महापालिकेत बदल्यांचा हंगाम असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने आणि शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने  सध्या महापालिकेत प्रभारी कारभार सुरू आहे.

पात्रतेकडे कानाडोळा करून पदभाराचंी खैरातहा कारभार देताना पात्रतेच्या निकषालाही डावलले जात आहे. ज्या शैक्षणिक पात्रतेच्या कारणामुळे प्रारंभी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा पदभार देण्यास नकार दिला होता त्याच पात्रतेकडे आता कानाडोळा करुन पदभाराची खैरात वाटप केली जात आहे. या सर्व बदल्या व पदभाराची खैरात ही पूर्णपणे राजकीय दबावातून व एकहाती सत्तेचा परिणाम असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. सध्या महापालिकेत बदल्यांचा हंगाम असल्याचे दिसत असून मूळ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने तसेच शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने महापालिकेत प्रभारीराज सुरू आहे़ क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे गौतम कवडे यांना पुन्हा एकदा आयुक्तांचे स्वीय सहायक म्हणून घेतले आहे. ते अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त म्हणूनही काम पाहतील.   वरिष्ठ लिपिक   मल्हार मोरे यांना शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला होता. तो बदलून आता अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून नेमले आहे. उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना तरोडा, सांगवी क्षत्रिय कार्यालयाची जबाबदारी दिली़ 

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTransferबदली