शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नांदेडमध्ये कंत्राटदारासाठी वाढीव दराचा महापालिका पॅटर्न ठरला वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:33 AM

वाढीव दराचा नवा पॅटर्न नांदेड महापालिकेने सुरू केला असून काम पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रियेतील दराऐवजी वाढीव दर अदा केले जात आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती सभा : दोन वर्षानंतर दिले २४ लाख वाढवून

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वाढीव दराचा नवा पॅटर्न नांदेड महापालिकेने सुरू केला असून काम पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रियेतील दराऐवजी वाढीव दर अदा केले जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा भूर्दंड महापालिकेला सोसावा लागत आहे. कर्जात बुडालेल्या महापालिकेकडून वाढीव दराची ही खैरातच ठरली आहे.महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत एकूण दहा विषयांना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये वाढीव दराने देयक अदा करण्याचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहे.नांदेडमध्ये २०१६-१७ या वर्षात गणेशोत्सव, दुर्गा उत्सव आदी सणानिमित्त मुख्य व अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया घेण्यात आली. त्यामध्ये ५५ लाख ११ हजार रुपयांची निविदा अंतिम करण्यात आले. साई कन्स्ट्रक्शनकडून हे काम करवून घेण्यात आले. मात्र २०१६-१७ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये नदी-घाटावर करण्यात आलेला घाटही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे कारण दाखवत तब्बल २४ लाख ११ हजार ५५९ रुपयांचे वाढीव रक्कम साई कन्स्ट्रक्शनला अदा करण्याचा ठराव घेण्यात आला.त्याचवेळी शहरात सध्या सुरू असलेल्या मुख्य रस्त्यावरील चौकांच्या डांबरीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या कामातही १५ लाख ६७ हजारांची वाढ दर्शविण्यात आली आहे. ‘क’ झोनमध्ये चौकांचे डांबरीकरण करुन त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारणे यासाठी उपायुक्तांच्या मान्यतेनुसार १५ लाखांची मान्यता देण्यात आली आहे. ४५ लाख ९९ हजार रुपये या कामावर खर्च होणार आहेत तर झोन ‘अ’ आणि ‘ड’ मध्येही २० लाखांची ५६ हजारांची निविदा प्रक्रिया मंजूर झाली असताना त्यात १५ लाख ५५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी या सर्व वाढीव रक्कमेचा बोजा महापालिकेला सहन करावा लागत आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रभाग १८ मध्ये पंचशीलनगर व उस्मानशाही मिल दरम्यान असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीची निविदा मंजूर केली आहे. त्याचवेळी पांडुरंगनगर, गोविंदनगर येथेही नाल्याच्या बांधकामासाठी जवळपास १ कोटीच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे.देगलूर नाका ते ममता कॉलनीपर्यंतच्या रस्त्यासाठी २०११ मध्ये करण्यात आलेल्या भूसंपादनाचा मावेजा देण्याचा ठरावही पारित करण्यात आला आहे.जिल्ह्यात सप्टेंबर १७ नंतर डीएसआरमध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चारवेळा वाढ झाल्याचे कारण देत वाढीव रक्कम योग्य ठरवली आहे. सर्वसाधारणपणे डीएसआरमध्ये वर्षाला बदल होत असतात. यावेळी मात्र सहा महिन्यात चार वेळा दरवाढ झाली.बुधवारी झालेल्या सभेत शहरातील पाणीप्रश्नावरही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNavratriनवरात्री