Nanded Crime: आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस? गुप्तांगावर लाथा, २२ वर्षीय तरुणाचा जागेवरच गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:39 IST2026-03-11T13:36:21+5:302026-03-11T13:39:15+5:30
नांदेड जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणाला घरी बोलावून जीव जाईपर्यंत मारहाण केली.

Nanded Crime: आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस? गुप्तांगावर लाथा, २२ वर्षीय तरुणाचा जागेवरच गेला जीव
नांदेडमधील बिलोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून एका तरुणाची मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करत एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केली. दुर्गेश्वर ठाकूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय दुर्गेश्वर ठाकूर यांचे थडीसावळी येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची माहिती तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाली.
मंगळवारी दुपारी (१० मार्च) तरुणीच्या कुटुंबीयांना दुर्गेश्वरला थडीसावळी गावात बोलावले. त्यानंतर त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. आमच्या मुलीसोबत संबंध का ठेवतोस? असे विचारत तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला घेरले.
वाद वाढत गेला आणि त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी दुर्गेश्वरला मारहाण करण्यास सुरूवात केली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दुर्गेश्वरच्या गुप्तांगावर लाथा मारल्या. त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. अतिमारामुळे त्याला उलट्या झाल्या आणि जागेवरच त्याने प्राण सोडला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमध्ये थडीसावळी गावातील ३ आणि शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील चार जणांचा समावेश आहे.
हत्या प्रकरणातील आरोपींची नावे
पद्मसिंह गंगा सिंह ठाकूर
राजू सिंह गंगा सिंह ठाकूर
गंगा सिंह हनुमान सिंह ठाकूर
दिलीप सिंह ठाकूर
विजय सिंह ठाकूर
विशाल सिंह ठाकूर
प्रताप सिंह ठाकूर