कंधार (जि. नांदेड): तालुक्यातील हटक्याळ गाव गुरुवारी मध्यरात्री एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने हादरून गेले आहे. घरगुती कारणावरून झालेल्या वादातून पोटच्या मुलानेच झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात वारंवार दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. सुरेश बाबुराव मोरे (वय ४८) असे मृत वडिलांचे नाव आहे.
असा घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मोरे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घरात अचानक किंकाळ्या आणि आक्रोशाचा आवाज घुमला. कौटुंबिक वादातून संतापलेला मुलगा सुदर्शन सुरेश मोरे (वय २७) याने अंगणातील एक मोठा दगड आणून झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्याने एवढ्यावरच न थांबता वारंवार डोक्यावर दगड आपटल्याने सुरेश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबाचा हंबरडा अन् गावात दहशत
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून आई चौत्राबाई मोरे, आजोबा बाबुराव मोरे आणि भाऊ सुजित मोरे यांनी एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश ऐकून रात्रीच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. हत्या केल्यानंतर आरोपी सुदर्शन अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेची माहिती मिळताच कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास कोकाटे आणि पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ५ तासांत पळून गेलेल्या आरोपी सुदर्शनला जेरबंद केले. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Kandhar, a son brutally murdered his sleeping father with a stone due to a family dispute. The accused, Su दर्शन More, was arrested within five hours. Police investigation underway.
Web Summary : कंधार में, एक बेटे ने पारिवारिक विवाद के चलते सोते हुए पिता की पत्थर से निर्मम हत्या कर दी। आरोपी सुदर्शन मोरे को पांच घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया गया। पुलिस जांच जारी है।