Maharashtra Crime: दहा वर्षांनी लहान असलेल्या एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मंगल धुमाळे असे मयत महिलेचे नाव आहे. प्रेयसीची हत्या करून आरोपी फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. किनवट तालुक्यातील पाटोदामध्ये ही घटना घडली आहे.
४५ वर्षीय मंगल कोंडिबा धुमाळे ही महिला अविवाहित होती. तिचे गावातीलच कृष्णा जाधव (वय ३५) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मंगल अविवाहित होती आणि पाटोदा गावात एकटी राहत होती. कृष्णा नेहम तिच्या घरी असायचा.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. 'मंगल माझ्याशी लग्न कर' अशी मागणी कृष्णा तिच्याकडे करत होता. त्यावरून मंगल आणि कृष्णाची भांडणे होत होती.
शनिवारी (२५ ऑक्टोबर) रात्री कृष्णा मंगलच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा लग्नावरून वाद झाले. रागाच्या भरात कृष्णाने मंगलचा गळा आवळला. मंगलचा खून केल्यानंतर कृष्णा फरार झाला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (२६ ऑक्टोबर) मयत मंगलची आई तिच्या घरी आली. त्यावेळी मंगल झोपलेल्या दिसली. त्यांनी आवाज दिला आणि नंतर मंगल मृतावस्थेत असल्याचे कळले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मंगलच्या घरात कृष्णाच्या चपला आढळून आल्या. इतकंच नाही, तर कृष्णाला घरातून पळून जाताना मंगलच्या बहिणीनेही बघितल्याची माहिती आहेत.
लग्न कर म्हणत कृष्णाने मंगलला मारहाण केली आणि नंतर तिचा खून केला, अशी तक्रार तिचा भाऊ दत्ता कोंडिंबा धुमाळे यांनी दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा जाधव विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : In Nanded, a 35-year-old man killed his 45-year-old girlfriend after she refused his marriage proposal. The accused, Krishna Jadhav, is absconding. Police are investigating the murder, which occurred in Patoda.
Web Summary : नांदेड में, एक 35 वर्षीय व्यक्ति ने अपनी 45 वर्षीय प्रेमिका की शादी के प्रस्ताव को अस्वीकार करने पर हत्या कर दी। आरोपी कृष्णा जाधव फरार है। पुलिस पाटोदा में हुई हत्या की जांच कर रही है।