शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसला धर्माबादला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:58 AM

नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़

ठळक मुद्देसरपंच संघटनेला महाव्यवस्थापक विनोदकुमार यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़धर्माबाद येथील रेल्वेच्या प्रलंबित मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसल्यामुळे येथील जनतेत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला होता. पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबई येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळेस धर्माबादच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने सिंकदराबाद येथे महाव्यवस्थापक विनोदकुमार यांची भेट घेतली़सदरील शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम, माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी, शंकर पाटील होट्टे, नगरसेवक भोजराज गोणारकर, छावाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील हारेगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे यांचा समावेश होता.यावेळी महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले, नगरसोल -नरसापूर जलद रेल्वेस धर्माबादला थांबा मिळावा, यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. जुलै महिन्यात रेल्वेस धर्माबादला थांबा मिळणार आहे. निजामाबाद-तिरुपती जलद रेल्वेस नांदेडपर्यंत सोडण्यात यावे, शहरातील रेल्वे ओव्हर ब्रीजचे लवकरच सर्वेक्षण करून ओव्हर ब्रीजच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही विनोदकुमार यांनी शिष्टमंडळाला सांगितले़नगरसोल-नरसापूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला धर्माबाद येथे थांबा मिळणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करण्यात येत होती़ आता या गाडीला थांबा मिळणार असल्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे