मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:29 IST2025-05-11T18:29:37+5:302025-05-11T18:29:50+5:30

९५ वर्षीय महिलेची अशाप्रकारे हत्या केल्यामुळे गावात संताप व्यक्त होतोय.

Murder of an elderly woman for 8 grams of gold and 10 grams of silver, Incident in hadgaon Nanded | मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

हदगाव: हस्तरा येथील ९५ वर्षीय एक वृद्ध महिला सायंकाळी ६:०० मंदीरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या असताना गावातील एका तरुणाने त्यांचा खून करून अंगावरील ९ ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ९ मे रोजी ७ ते ८ दरम्यान घडली, पण आज (११ मे) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. 
या घटनेनंतर आरोपी पसार झाला.

सिताबाई रामभाऊ फुले (९५) असे या वृद्ध महीलेचे नाव आहे. पुजेला गेलेली आजी परत घरी आली नाही म्हणून नातवाने शोध घेतला, पण त्या आढळल्या नाही. यानंतर नातू सागर फुले यांनी हदगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली व घटनास्थळी भेट दिली. दिवसभर शोध घेतला पण आजीबाई भेटल्या नाही. अखेर ज्या शेतात मृतदेह आढळला, त्या शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली.

मृतदेह पाहताच त्यांच्या अंगावरील दागिने लंपास केल्याचे आढळले. कानातील सोन्याच्या बाळ्या तर कान तुटेपर्यंत ओरबडुन नेल्या होत्या. हा चोरीचा प्रकार असल्याचे पोलिसांनी अंदाज बांधत शोध सुरू केला. रात्री ३:०० वाजता आरोपी मरडगा गावातील शिवारात असल्याचे मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांना कळाले. यानंतर आरोपी खंडेराय शेषराव सोळंके (२५) याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुन केल्याचे कबूल केले.

 

Web Title: Murder of an elderly woman for 8 grams of gold and 10 grams of silver, Incident in hadgaon Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.