दोन्ही गटांतील व्यक्तींना उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:20+5:302021-06-03T04:14:20+5:30

श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, ...

Individuals in both groups will receive the vaccine as it becomes available | दोन्ही गटांतील व्यक्तींना उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

दोन्ही गटांतील व्यक्तींना उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या ८ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस देण्यात येणार असून, या ठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाणार आहे. तर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय येथे दोन्ही गटांतील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी ३० डोस, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जंगमवाडी येथे प्रत्येकी ४० डोस तर हैदरबाग या केंद्रावर ९० डोस उपलब्ध आहेत. हे दोन्ही वयोगटातील म्हणजेच १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरले जातील.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बारड, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या १६ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. हे डोस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दिले जातील.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, नायगाव, उमरी या १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. याचबरोबर ग्रामीण रुग्णालय कंधार व मुदखेड या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे अनुक्रमे ९० व ६० डोस उपलब्ध असून, हेसुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असून, ही लस ४५ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्याने दिली जाईल.

जिल्ह्यात १ जूनपर्यंत एकूण ४ लाख ३३ हजार ३४७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर २ जूनपर्यंत कोविड-१९ लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे ४ लाख २ हजार ६३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख १९ हजार ९४० डोस याप्रमाणे एकूण ५ लाख २२ हजार ५७० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षांवरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Individuals in both groups will receive the vaccine as it becomes available