शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:27 IST

राज्याच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ही संघर्षयात्रा सुरु आहे. यात्रेच्या धास्तीनेच राज्य शासनाने १८५ तालुके दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले आहेत. जनहितासाठीचा सरकारवरील रेटा यापुढील कळातही कायम ठेवू, असा शब्द देतानाच मराठवाड्याच्या हक्काचे अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : राज्याच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ही संघर्षयात्रा सुरु आहे. यात्रेच्या धास्तीनेच राज्य शासनाने १८५ तालुके दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले आहेत. जनहितासाठीचा सरकारवरील रेटा यापुढील कळातही कायम ठेवू, असा शब्द देतानाच मराठवाड्याच्या हक्काचे अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिला.हदगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, नगराध्यक्ष ज्योतीबाई राठोड, उपनगराध्यक्ष सुनील सोनवणे, माजी नगराध्यक्ष अमित अडसूळ, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, तालुका अध्यक्ष बाबूराव पाथरडकर, अनिल पाटील बाभळीकर आदींची उपस्थिती होती.आपलेच पैसे काढण्यासाठी या सरकारने बँकेसमोर सर्वसामान्यांना उभे केले. दुसरीकडे इंधन दरवाढ करुन जनतेच्या खिशाला कात्री लावली. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारचा कारभारही नियोजनशून्य असल्याचे सांगत कर्जमाफीची सरकारने केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ओंजळी रिकाम्याच राहिल्या आहेत. या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाºया लोकसभा, विधानसभेची संधी चुकवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या विकासाचा शब्द देवून हे सरकार सत्तेत आले. मात्र सत्ता हाती आल्यानंतर जनतेला विसरले. आज देशाचे संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.दुसरीकडे देशातील सर्वोच्च यंत्रणा या सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे आपली स्वायतत्ता गमावत असल्याचे सांगत चार वर्षांत सरकारने देशातील लोकशाहीसमोरच आव्हान उभे केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आता रबीचा हंगाम सुरु आहे. त्यासाठी २४ तास विजेची आवश्यकता असते. परंतु, ग्रामीण भागात १५-१८ तास भारनियमन केले जात आहे. दुसरीकडे केवळ डिझेल उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या डीपी बंद आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकºयांना पिकांना पाणीही देता येत नाही. अशा या शेतकरीविरोधी सरकारला पुन्हा थारा देवू नका, असे सांगत जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. राफेल घोटाळ्यामुळे हे सरकार किती भ्रष्ट आहे, हेही जनतेसमोर आल्याचे सांगत यापुढील काळात भावनेच्या आहारी न जाता मतदान करा. सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेणाºया काँग्रेसच्या पाठीशी रहा, असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण झाले. सेना-भाजप सरकारच्या कारभाराला शेतक-यांसह राज्यातील सर्वच घटक वैतागल्याचे सांगत मागील चार वर्षांतील या सरकारच्या कार्यकाळात तब्बल १६०० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी युती शासन केवळ भाषणबाजी करण्यामध्ये गुंग असल्याचे सांगत राज्याचा कारभार हाकण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. हदगाव येथे झालेल्या या सभेला जवळपास दहा हजारपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण