'त्याने' ३६ वर्ष केली बोगस कागदपत्राद्वारे नोकरी; निवृत्तीच्या उंबरठ्यावर झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:03 PM2018-05-10T16:03:19+5:302018-05-10T16:03:19+5:30

बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे त्याने एसटी  महामंडळात नोकरी मिळवली, यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल ३६ वर्ष त्याने येथे चालकाची सेवा दिली. आता जून अखेरीस तो सेवानीवृत्त होणार होता मात्र त्या आधीच कागदपत्रांच्या तपासात त्याची बनावटगिरी उघडकीस आली.

He did service of 36 years by bogus document; fraud disclosed on the edge of retirement | 'त्याने' ३६ वर्ष केली बोगस कागदपत्राद्वारे नोकरी; निवृत्तीच्या उंबरठ्यावर झाले उघड

'त्याने' ३६ वर्ष केली बोगस कागदपत्राद्वारे नोकरी; निवृत्तीच्या उंबरठ्यावर झाले उघड

Next
ठळक मुद्दे बिलोली आगारात यशवंत कांबळे हा चालक म्हणून कार्यरत आहे. येत्या जूनमध्ये तो सेवानीवृत्त होणार आहे.

बिलोली ( नांदेड ) : बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे त्याने एसटी  महामंडळात नोकरी मिळवली, यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल ३६ वर्ष त्याने येथे चालकाची सेवा दिली. आता जून अखेरीस तो सेवानीवृत्त होणार होता मात्र त्या आधीच कागदपत्रांच्या तपासात त्याची बनावटगिरी उघडकीस आली. यशवंत कांबळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो बिलोलीच्या एसटी आगारात कार्यरत होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बिलोली आगारात यशवंत कांबळे हा चालक म्हणून कार्यरत आहे. येत्या जूनमध्ये तो सेवानीवृत्त होणार आहे. या आधी कांबळे याने ३६ वर्षांपूर्वी नोकरीसाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यात त्याने जळकोट येथील शाळेची ८ पासची दिलेली कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले. या शाळेत कांबळे याचे नावच नव्हते, यामुळे त्यांची बोगसगिरी उघडकीस आली. या अहवालाद्वारे नांदेड येथील विभागीय नियंत्रकांनी कांबळे याला तत्काळ सेवेतून बडतर्फ केले. 

Web Title: He did service of 36 years by bogus document; fraud disclosed on the edge of retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.