शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

नांदेडमध्ये गोदावरी शुद्धीकरण कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:13 AM

हजारो माशांच्या हत्याकांडाला जबाबदार कोण?

ठळक मुद्देनांदेडमध्ये गोदावरी शुद्धीकरणाचे १४ कोटी पाण्यातशुद्धीकरणासाठी नव्याने ७७ कोटींचा प्रस्ताव

- अनुराग पोवळे

नांदेड : गोदावरीकाठी हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २००८ पासून जवळपास १४ कोटी रुपये खर्चूनही गोदावरी नदीचे शुद्धीकरण केवळ कागदावर राहिले आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रकल्प बंदच असल्याने हे पाणी दररोज विनाप्रक्रीेया गोदेच्या पात्रात सोडले जात आहे. हजारो माशांच्या या हत्याकांडाला जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. 

नांदेडमधून वाहणा-या गोदावरी नदीत शहरातून जवळपास १८ नाले मिसळतात़  या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या १३ कोटींच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला़ बोंढार येथे ११० एकर जागेवर मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला.  नाल्यांचे पाणी देगलूरनाका येथील पंपगृहापर्यंत आणून ते या केंद्रात पोहोचविणे अपेक्षित होते़ २००८ मध्ये ही योजना पूर्ण झाली़, तरी त्याचा वापर मात्र झाला नाही़ २००८ ते २०१७ पर्यंत या योजनेकडे कोणीही पाहिले नाही. या १३ कोटींच्या योजनेला महापालिकेने २०१७साली पुन्हा ५५ लाख खर्चून कार्यान्वित केले़ त्यामध्ये पंपगृहात ३०० एचपीचे दोन पंप आणि १५० एचपीचे १ पंप खरेदी करण्यात आला. शहरातील १८ नाल्यांचे पाणी थेट बोंढार जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. २०१७मध्ये केवळ सहा महिने हा प्रकल्प चालला. त्यानंतर त्याकडे पुन्हा कोणीच पाहिले नाही.

१३ कोटी ५५ लाख रुपये पाण्यात गेल्यानंतर महापालिकेने २०१८ मध्ये गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी २२ कोटी ६७ लाख रुपयांचा अहवाल पर्यावरण विभागाकडे पाठवला. तो शासनाकडून परत पाठवण्यात आला़ त्यामुळे २०१९ मध्ये पालिकेडून पुन्हा ७७ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला़ हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यातील पहिल्या टप्प्याचे १७ कोटी रुपये महापालिकेला मिळालेदेखील आहेत. आता या १७ कोटींतून चुनाल नाला येथे उभारण्यात येणाºया मलशुद्धीकरण केंद्राचे काम केले जाणार आहे. कार्यारंभ आदेशानंतरही अद्याप हे काम सुरू झालेले नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसगोदावरी नदीचे वाढते प्रदूषण पाहून २०१८ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडेच होते़ सांडपाण्यामुळे गोदावरीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे़ याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना मंडळाकडून महापालिकेला देण्यात आली होती़ फक्त काही दिवस नदीत मिसळणारे नाले बंद करण्यात आले एवढेच.

प्रशासकीय अनास्था कारणीभूतगोदावरीच्या आज झालेल्या दूरवस्थेसाठी प्रशासकीय अनास्था कारणीभूत ठरली आहे़ नांदेडमध्ये मी असताना गोदावरी शुद्धीकरणासाठी अनेक मोहीमा राबविल्या़ त्याला जनप्रतिसाद मिळाला़ प्रशासकीय पातळीवर मात्र हा विषय दुर्लक्षितच राहिला़ त्यामुळे गोदावरी प्रदूषितच राहिली आहे़ शुद्धीकरणाचे कोट्यवधीचे प्रस्ताव मात्र कागदावरच आहेत- डॉ़श्रीनिवास औंधकर, संचालक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्र, औरंगाबादनदीच्या शुद्धतेची जबाबदारी सर्वांचीच नागरीकरणामुळे नद्यांना अडवण्यात आले आहे. प्रदूषणाचे अनेक घटक नदीत मिसळले जात आहेत. गोदावरीचेही तेच होत आहे.  नदी शुद्ध करण्याची जबाबदारी एकट्या महापालिकेचीच नसून निसर्ग रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.-डॉ़ए़एऩ कुलकर्णी, पर्यावरण तज्ञ तथा पक्षीप्रेमी़पैसे खर्चूनही हाती काहीच लागले नाही१३ कोटींच्या योजनेअंतर्गत करण्यात आलेले काम सदोष होते़ त्यामुळे योजनेची हेतूप्रमाणे अंमलबजावणी झालीच नाही़ महापालिकेने ५५ लाख खर्च करुन योजनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला़ परंतु, योजनेअंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्या अतिशय कमी व्यासाच्या होत्या़ त्यामुळे या योजनेतून हाती काहीच लागले नाही, असेच म्हणावे लागेल़- विलास भोसीकर, उपायुक्त (विकास), महापालिका नांदेड पाणी व मृत माशांच्या नमुन्यांचे अहवाल आज येणारगोदावरी नदीमध्ये नगीनाघाट भागात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर शनिवारी महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरी नदीचे पाणी आणि मृत माशांचे नमुने घेतले होते़ त्याचो अहवाल सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त होतील़ त्यानंतर माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे मनपाचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़रईसोद्दीन यांनी सांगितले़ 

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण