आखाड्यावरून शेतकऱ्याच्या मेंढ्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST2021-05-05T04:28:47+5:302021-05-05T04:28:47+5:30

जुन्या वादातून मजुराला बेदम मारहाण शहरातील केळी मार्केट भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. ही ...

The farmer's sheep ran away from the arena | आखाड्यावरून शेतकऱ्याच्या मेंढ्या पळविल्या

आखाड्यावरून शेतकऱ्याच्या मेंढ्या पळविल्या

जुन्या वादातून मजुराला बेदम मारहाण

शहरातील केळी मार्केट भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २ मे रोजी घडली. दिलीप भुजंग ओढणे हे २ मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास केळी मार्केट परिसरात थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आला. यावेळी आरोपीने फायटरने ओढणे यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

शहरातील श्रीनगर भागात विवाहितेला पाच लाख रुपयांची मागणी करून छळ करण्यात आला. नवीन घर घेण्यासाठी पीडितेला सासरकडून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींनी मारहाण करून घराबाहेर हाकलले. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन ठिकाणी दारू विक्रीवर छापे

माहूर शहरातील गणेशनगर भागात अडीच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे, तर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुजी हाॅस्पिटलजवळ पानटपरीच्या मागे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून साडेतीन हजारांची दारू जप्त करण्यात आली.

Web Title: The farmer's sheep ran away from the arena