खळबळजनक ! तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील वाळू घाटात आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:48 PM2022-04-08T16:48:12+5:302022-04-08T16:49:00+5:30

हा वाळू घाट सुरु झाल्यापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे.

Exciting! Rotten body found in sand dunes on Telangana-Maharashtra border | खळबळजनक ! तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील वाळू घाटात आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

खळबळजनक ! तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील वाळू घाटात आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

googlenewsNext

बिलोली ( नांदेड ) : तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील सगरोळी गावालगतच्या वाळू घाटात आज दुपारी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.  

गेल्या महिनाभरापासून हा वाळू घाट सुरु झाला आहे. येथे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केल्याने पाच ते दहा फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. अशाच एका पाण्याने भरलेल्या खड्यात हा मृतदेह आज आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी बालाजी सातमवार यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेहावर अत्यंविधी केला. हा वाळू घाट सुरु झाल्यापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. आता येथे मृतदेह आढळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Web Title: Exciting! Rotten body found in sand dunes on Telangana-Maharashtra border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.