शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

निवडणुकीनंतरही मेगाभरती सुरूच, शेकापचे आमदार भाजपच्या गोटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:20 PM

शेकापचे श्यामसुंदर शिंदे भाजपच्या गोटात

नांदेड : शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारीवर लोहा इथून निवडून आलेले श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे़ याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली़

लोहा मतदारसंघातील उमेदवारीवरून श्यामसुंदर शिंदे आणि खासदार चिखलीकर यांच्यात सुरुवातीच्या काळात कुरबुरी झाल्या होत्या. हा मतदार संघ सेनेला सुटल्यामुळे चिखलीकरांचीही अडचण झाली होती़ चिखलीकरांचे मेव्हणे असलेल्या शिंदे कुटुंबियांनी चिखलीकरांच्या विरोधात उघडपणे पवित्रा घेत, अपक्ष लढविण्याची तयारी सुरु केली होती़ परंतु ऐनवेळी शेकापची उमेदवारी मिळविण्यात शिंदे यांना यश आले़  त्यानंतर मात्र दोन्ही कुटुंबात मनोमिलन झाले़ त्यानंतर चिखलीकर यांनी आपली संपूर्ण शक्ती शिंदे यांच्या विजयासाठी लावली होती़ शुक्रवारी झालेल्या पत्रपरिषदेत चिखलीकर यांनी शिंदे यांचा भाजपला पाठिंबा जाहीर केला़ 

श्यामसुंदर शिंदे यांनी मिळवला एकतर्फी विजयमन्याडखोऱ्यात तब्बल तीन दशकानंतर शेकापचा खटारा वेगात धावत विजयी झाला आहे. तर शिवसेनेचा  गड ढासळला. श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, विक्रांत शिंदे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवत, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करत पहिल्याच प्रयत्नात निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यांना चिखलीकर समर्थकांनी  समर्थपणे साथ दिली. २०१९ च्या  विधानसभा निवडणूक रिंगणात प्रताप पा.चिखलीकर व शंकरअण्णा धोंडगे नव्हते. परंतु चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे व शंकरअण्णा यांचे पुत्र दिलीप धोंडगे व भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे पुत्र अ‍ॅड.मुक्तेश्वर धोंडगे निवडणूक रिंगणात होते. प्रवीण पा.चिखलीकर यांची भाजपा उमेदवारीची मोठी नामी संधी हुकली. परंतु, महायुतीची उमेदवारीची  संधी  अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांना मिळाली. परंतु या संधीचा फायदा घेत त्यांना विजय मिळवता आला नाही. विधानसभा निवडणूक प्रचारात  रा. कॉ., कॉग्रेस, मित्रपक्ष  आघाडी, महायुती नावालाच राहिली. आपआपल्या सोयीनुसार विविध पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते यांनी राजकीय कोलांटउड्या मारल्या. नेमके कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा ताळमेळ बसत नव्हता.

टॅग्स :NandedनांदेडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019loha-acलोहाBJPभाजपा