भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:36 IST2018-12-06T19:35:05+5:302018-12-06T19:36:01+5:30

नांदेड-नागपूर महामार्गावरील पार्डी म.(ता.अर्धापूर) पाटीवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला अपघात

Due to the ambulance rush in a moving vehicle, two-wheeler rider killed on the spot | भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नांदेड : नांदेड-नागपूर महामार्गावरील पार्डी म.(ता.अर्धापूर) पाटीवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृताचे नाव सुभाष हट्टेकर (५५) असे आहे.

तालुक्यातील पांगरी येथील सुभाष शंकरराव हट्टेकर हे आपले काम आटोपून वारंगाहून पांगरीकडे आपल्या दुचाकीवरून (क्र-एम.एच- २६ ए. एम.१७७४) येत होते.  त्याच बाजूने येणाऱ्या भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने नांदेड-नागपूर महामार्गावरील पार्डी म. पाटीवर पाठीमागून दुचाकीला जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका मात्र अपघात होऊनही त्या ठिकाणी न थांबता निघून गेली. रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्यामुळे तिचा क्रमांक कळू शकला नाही. सुभाष हट्टेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असून त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Due to the ambulance rush in a moving vehicle, two-wheeler rider killed on the spot