शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

चिमेगाव येथील ‘त्या’ वाळू कारखान्याची होणार सखोल चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:32 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तालुक्यातील चिमेगाव येथील अनधिकृतपणे चालणाऱ्या वाळू दळण्याच्या कारखान्यावर शनिवारी महसूल प्रशासनाकडून कारवाई करीत कारखाना जप्त केला़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी रविवारी सदर कारखाना तसेच परिसराची पाहणी करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले़ यासंदर्भातील तपास पोलिसांकडे देणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले़आठवडाभरापासून तहसीलदार किरण अंबेकर यांच्या ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गुन्हा दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तालुक्यातील चिमेगाव येथील अनधिकृतपणे चालणाऱ्या वाळू दळण्याच्या कारखान्यावर शनिवारी महसूल प्रशासनाकडून कारवाई करीत कारखाना जप्त केला़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी रविवारी सदर कारखाना तसेच परिसराची पाहणी करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले़ यासंदर्भातील तपास पोलिसांकडे देणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले़आठवडाभरापासून तहसीलदार किरण अंबेकर यांच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया आणि वाळूची अनधिकृत वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती़ दरम्यान, चिमेगाव येथे अनधिकृतपणे चालणाºया वाळू दळण कारखान्यावर तहसीलदार अंबेकर यांनी धाडसी कारवाई केली़यामध्ये वाळू, ट्रॅक्टर, कारखाना जप्त करण्यात आला होता़ सदर कारवाई उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदारांच्या पथकाने केली़ यामध्ये चिमेगाव येथील गट क्र.५२. ५५ व ५८ मधील बालाजी शंकरराव नळगे यांच्या शेतातील कोणतीही परवानगी नसलेला वाळू दळण्याचा कारखाना जप्त केला़ यामध्ये २ फ्लोअर मिल, १० ब्रास वाळू, १५०० पोती दळलेली वाळू, टिप्पर (क्र. एमएच-२६-एपी-२२०) व (एमएच-२६-के-९९१८) क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला. दरम्यान, सदर कारखान्याची जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पाहणी केली़यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, पठाण, लिंबगाव ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर आदींची उपस्थिती होती़सदर कारखान्यासाठी वापरण्यात येणाºया वाळूची रॉयल्टी भरलेली आहे काय, वीजजोडणी कोणत्या प्रकारची आहे, सदर वाळूचे पीठ करून ते कशासाठी वापरले जात आहे? आदी बाबींचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले़ तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन झाले असून त्याची चौकशी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.---दरम्यान, सदर कारखान्यात वाळू दळून ती घरबांधकामासाठी विक्री केली जात असल्याचे कारखानाचालक नळगे यांनी सांगितले़ परंतु, याठिकाणी सिमेंटची पोती, तसेच पीठाप्रमाणे बारीक दळलेली वाळू आणि पीठ गिरणी आढळून आले आहेत़ त्यामुळे सदर वाळू खाद्यपदार्थ अथवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास करण्यात येईल.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूPoliceपोलिस