शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 6:57 PM

अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून २० जणांचा शोध सुरु करण्यात आला़ त्यातील १६ जण स्वाधीन झाले़ या सर्वांवर आरोग्य विभागाकडून उपचारही सुरु करण्यात आले़ मात्र उर्वरित चार जण अद्यापही पसार

नांदेड : शहरातील नगीनाघाट परिसरात आढळून आलेल्या २० कोरोनाग्रस्तांपैकी फरार असलेल्या ४ जणाविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़ सुरेशसिंह बिसेन यांनी या संबंधी  सोमवारी सायंकाळी वजीराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़

नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुना तेथे कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर लंगर साहिब गुरुद्वारातील ६७ सेवेकºयांची नमुने घेण्यात आले होते़ या नमुन्यांचा अहवाल २ मे रोजी शनिवारी प्राप्त झाला असता त्यातील २० जण कोरोना बाधीत असल्याचे उघड झाले होते़ मात्र याचवेळी प्रशासनाचा हलगर्जीपणाही चव्हाट्यावर आला होता़ स्वॅब नमुने घेतल्यानंतर वरील सर्व ६७ जणांना प्रशासनाने क्वारंटाईन करणे आवश्यक होते़ मात्र तसे न केल्याने 9 असल्याने अखेर मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ सुरेशसिंह बिसेन यांनी चौघाविरोधात सोमवारी सायंकाळी वजीराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यावरुन मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला़

दरम्यान, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिका हद्दीतील नगिनाघाट गुरुद्वारा परिसर या क्षेत्रामध्ये कोविड-१९ चे रुग्ण आढळून आल्यामुळे नगिनाघाट गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगरसाहेब कंपाऊंड, बडपुरा, शहिदपूरा, रामकृष्ण टॉकिज, परिसर या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केले असून येथे विविध उपाययोजना व नियोजनासाठी पाच अधिकाºयाची नियुक्तीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.  

स्वॅब घेताना अनेकांची नावेही नोंदविली अर्धवटनगीनाघाट परिसरातील २० जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ २ मे रोजी हा अहवाल प्राप्त झाल्यापासून वरील २० पैकी ४ कोरोना बाधीत रुग्णांचा धांगपत्ता लागलेला नाही़ प्रशासनाने  स्वॅब नमुने घेतल्यानंतर या सर्वांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते़ मात्र ही कार्यवाही झाली नाही़ दुसरीकडे स्वॅब घेताना अनेकांची नावेही अर्धवट नोंदविली गेल्याने प्रशासनासमोरचा गुंता आणखीनच वाढला आहे़ विशेष म्हणजे बाधीत आढळलेल्या २० पैकी केवळ १२ जणांकडेच मोबाईल होता़ असेही आता पुढे येत आहे़

तीन दिवसांपासून प्रशासनाची शोध मोहिमनगीनाघाट परिसरातील बाधीत आढळलेले चौघेजण २ मे पासून पसार असल्याचे पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली़ प्रशासनाने या चौघांच्या शोधासाठी बैठकावर बैठका घेत शोध मोहिम राबविण्यास सुरुवात केली असली तरीही या प्रकारामुळे अवघे जिल्हावासीय धास्तावल्याचे चित्र आहे़ या प्रकारानंतर लंगर साहिब गुरुद्वारा परिसर प्रशासनाने कंन्टेन्मेट झोन जाहीर करीत या भागात मोठा फौजफाटाही तैनात केलेला आहे़ प्रसार असलेले चौघेजण इतरांच्या संपर्कात आल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता असून, यामुळे यंत्रणेचीही झोप उडाली आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड