बिलोली येथे दत्तनाम पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST2020-12-30T04:24:07+5:302020-12-30T04:24:07+5:30

- गत ७ दिवसांपासून येथील प्रसिद्ध असलेल्या दत्तमंदीर येथे २९ डिसेंबर रोजी दत्त जयंती दिनी दत्तमंदीर समितीच्यावतीने महाआरतीकरुन ...

Conclusion of Duttnam Parayana at Biloli | बिलोली येथे दत्तनाम पारायणाची सांगता

बिलोली येथे दत्तनाम पारायणाची सांगता

- गत ७ दिवसांपासून येथील प्रसिद्ध असलेल्या दत्तमंदीर येथे २९ डिसेंबर रोजी दत्त जयंती दिनी दत्तमंदीर समितीच्यावतीने महाआरतीकरुन दत्त पारायण सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे. गत २५ वर्षांपासून बिलोली येथिल दत्तमंदीर येथे दत्तजयंती निमित्त भव्य याञा व अन्नदान केले जात असुन तालुक्यातील १० हजार भाविकांनी याचा लाभ घेत होते माञ यंदा कोरोनाने भक्तांची वाट रोखली. परंतु परीसरातील भाविकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करत महाआरती करण्यात आली आहे. सदर जन्मोत्सवाच्या अगोदर सर्व भक्तांना बिलोली शहर विकास कृती समिती तर्फे मास्क वाटप करण्यात आले. या धार्मिक कार्यास ऍड.उपेंद्र बिलोलीकर, प्रभारी नगराध्यक्ष मारोती पटाईत, माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड,माजी नगराध्यक्ष रणवीर सिंह चौहान, माजी उपाध्यक्ष यशवंत गादगे ,माजी नगरसेवक नरसिंग मेघमाळे, शंकर अरगुलवर ,नागनाथ संगमावर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Conclusion of Duttnam Parayana at Biloli