शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 7:14 PM

लोकसभेत 'हात' देणाऱ्या तालुक्याने विधानसभेत दिली विजयी आघाडी

ठळक मुद्देकार्यकर्त्यांना विश्वासात घेत अशोकरावांनी स्वत: केले प्रचाराचे नियोजन

भोकर :  विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मतदारांनी दिलेल्या मताधिक्याने मतदारसंघात अशोकपर्वाला स्वीकारुन प्रतिस्पर्धी विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आणि भोकरमध्ये चव्हाण विरुद्ध गोरठेकर यांच्यातील पारंपारिक लढतीत १९७८ ची पुनरावृत्ती करुन चव्हाण यांचेच वर्चस्व पुन्हा सिध्द केले.

लोकसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघामध्ये काँग्रेसला ५ हजाराची पिछाडी तर नांदेड दक्षिण मतदारसंघात ३० हजार मतांची आघाडी घेतली तरीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोकर मतदारसंघातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे राज्याचे लक्ष मतदारसंघाकडे लागले होते. लोकसभेतील पराभव जिव्हारी लागलेली काँग्रेस सर्व शक्तीनिशी मैदानात उतरल्याने काँग्रेसविरुद्ध भाजपा लढत निश्चित झाली. लोकसभेतील विजयानंतर भाजपाने विधानसभा जिंकण्याचा संकल्प केला मात्र  उमेदवारी देण्यावरून बरीच खलबते उडाली. भाजपातील निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी विशेष प्रयत्न करुन उमेदवारी मिळवून दिल्याने लोकसभेत एकवटलेली भाजपा अंतर्गत दुभंगल्याचे चित्र प्रचारात दिसून आले.

निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत प्रचाराचे नियोजन केले. चव्हाण यांनी मतदारांच्या भावना ओळखून प्रचारात लहानथोर, नवयुवक यांच्या भेटीवर भर दिला. शहर, ग्रामीण भागात पक्षाची भूमिका मांडत सत्ताधारी पक्षाने पाच वर्षात केलेल्या कामगिरीवर चौफेर समाचार घेत ग्रामपंचायत सारखी निवडणूक समजू नका, मी येथेच मरणार अशी भावणीक साद घालून सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पीककर्ज, पीकविमा यासरख्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. यास मतदारांनीसुध्दा जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होणार नाही अशा सुरात प्रतिसाद दिला.

काँग्रेस प्रचारासाठी शहरी, ग्रामीण कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी आपापले क्षेत्र मजबूत करण्यासाठी डोळ्यात तेल ओतून विरोधकांना कसलीही संधी दिली नाही. यामुळे झालेल्या मतदानात लोकसभेतील हाणी भरुन काढीत प्रत्येक सर्कलमध्ये विरोधका पेक्षा किमान १० हजाराचे मताधिक्य काँग्रेसला मिळून विजय संपादन केला. यासाठी माजी आमदार अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजुरकर, गोविंदराव नागेलीकर, जगदीश भोसीकर, सुभाष पाटील किन्हाळकर, संजय देशमुख लहानकर, गोविंदबाबा गौड, प्रकाश देशमुख भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, विनोद चिंचाळकर, शेख युसूफ, सुभाष कोळगावकर, सुर्यकांत बिल्लेवाड, रामचंद्र मुसळे, गुलाबराव चव्हाण, गणेश राठोड, संजय बरकमकर, सिद्धेश्वर पिटलेवाड, ताहेरबेग, खाजु इनामदार, विठ्ठल धोंडगे, राष्ट्रवादीचे आनंद चिठे, शिवाजी कदम आदीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भोकरमध्ये लोकसभेत ५ हजारांची पिछाडी, विधानसभेत ३३ हजारांचे मताधिक्यलोकसभा निवडणुकीत ५ हजार मताने पिछाडीवर राहिलेल्या भोकर तालुक्यात विधानसभेत ३३ हजाराचे मताधिक्य मिळाले. भोकर तालुक्यात काँग्रेसला ५१ हजार ४५० तर भाजपाला १७ हजार ७६४ मते मिळाली. यात सर्वाधिक मतदान पाळज गटात काँग्रेसला १४ हजार ८६४ तर भाजपाला ५ हजार ९८ मते मिळाल्याने येथे काँग्रसला ८७६६ मतांची आघाडी मिळाली. भोसी गटात काँग्रेस १३,१२४, तर भाजपा ३७६३ मते मिळाल्याने काँग्रेसला ९६५० मताची आघाडी मिळाली आणि पिंपळढव गटात काँग्रेसला १२७९७ तर भाजपाला ४४८८ मते मिळाल्याने येथेही काँग्रेसलाच ८३०९ मतांची आघाडी मिळाली. भोकरमध्ये काँग्रेसला १०७०५ तर भाजपाला ४४१५ मते पडल्याने येथेही ६२९० मतांची आघाडी मिळाल्याने प्रचारात विरोधकांनी केलेल्या आरोपांना मतदारांनीच मतातून उत्तर दिले. लोकसभा मतदानात भाजपाला  आघाडी दिलेल्या गावांनी काँग्रसला आघाडी दिल्याचे स्पष्ट झाले आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणbhokar-acभोकरcongressकाँग्रेसNandedनांदेड