जिल्ह्यात सर्पदंशाच्या ८४५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:08+5:302020-12-30T04:23:08+5:30

भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या ५२ जातींपैकी मानवी वस्तीजवळ आढळून येणाऱ्या सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच जातीचे ...

845 cases of snake bites in the district | जिल्ह्यात सर्पदंशाच्या ८४५ घटना

जिल्ह्यात सर्पदंशाच्या ८४५ घटना

भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या ५२ जातींपैकी मानवी वस्तीजवळ आढळून येणाऱ्या सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच जातीचे साप विषारी आहेत. तसेच मांजऱ्या, हरणटोळ हे निमविषारी साप आहेत. तर बिनविषारीमध्ये धामण, धुळनागिण, डुरक्या, पाणदिवड, कवड्या, कुकरी, तस्कर, नानेटी या जातीचे साप आढळून येतात. परंतु आढळणाऱ्या प्रत्येक सापापासून धोका असल्याची समजूत करून त्याला मारण्यात येते. ग्रामीण भागात अनेकवेळा वेळेवर औषध उपलब्ध होत नाहीत, उपचारास विलंब होतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

साप चावताच काय काळजी घ्यावी

साप चावल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्या व्यक्तिला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे, विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने आवळून बांधावे, सर्पदंश झालेल्या व्यक्तिला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट टाकून बांधावे. दवाखान्यात जाताना शक्यतो फोनवरून डॉक्टरांना अगोदर माहिती द्यावी, अशी माहिती सर्पमित्र प्रसाद शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात आढळणारे साप

जिल्ह्यात साधारणपणे चार प्रकारचे विषारी साप आढळतात. त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे आहेत. तर जवळपास २० प्रकारचे बिनविषारी साप आढळतात. घरात साप आढळल्यानंतर घाबरून जाऊ नका, त्याला मारू नका. लगेच सर्पमित्राला कळवा. सर्पमित्र येईपर्यंत कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षित अंतरावरून त्यावर लक्ष ठेवावे.

Web Title: 845 cases of snake bites in the district