नांदेड विभागात स्वेच्छा निवृत्तीसाठी ४५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST2020-12-30T04:24:12+5:302020-12-30T04:24:12+5:30

नांदेड विभागात ३,३०० हून अधिक कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश चालक - वाहक असून, त्यांनाच विविध आजार ...

45 applications for voluntary retirement in Nanded division | नांदेड विभागात स्वेच्छा निवृत्तीसाठी ४५ अर्ज

नांदेड विभागात स्वेच्छा निवृत्तीसाठी ४५ अर्ज

नांदेड विभागात ३,३०० हून अधिक कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश चालक - वाहक असून, त्यांनाच विविध आजार आणि पाठदुखीने ग्रासले आहे. नांदेड विभागात कार्यरत असलेले विठ्ठल बट्टेवाड हे २० वर्षे चालक म्हणून सेवा देऊन स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत. पाठदुखीने त्रस्त झालेल्या बट्टेवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करूनही त्यांचा पाठदुखीचा त्रास कमी झालेला नाही. त्यात त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा विविध जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागत आहेत. त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या आणि कौटुंबीक परिस्थिती तसेच आरोग्य पाहून त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे, अशी इच्छा त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. अशीच परिस्थिती अनेक बस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची आहे.

नांदेड विभागात जवळपास ६६२ कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी पात्र आहेत. त्यापैकी ४५ जणांनी आजपर्यंत स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी अर्जही केले आहेत. यामध्ये सर्वाधिक २३ चालक आहेत. त्यापाठोपाठ १२ वाहक, प्रशासनातील ४ आणि यांत्रिक विभागातील ६ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

योजनेचा असा लाभ मिळणार

सेवानिवृत्तीप्रमाणे देय असलेले भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजा रोखीकरण आदी लाभ मिळणार, सेवानिवृत्ती स्वीकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास १५ दिवसांत त्याचा निपटारा केला जाईल. स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर मोफत कौटुंबीक पास देण्याची योजना लागू राहील.

Web Title: 45 applications for voluntary retirement in Nanded division