नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 04:22 PM2021-07-07T16:22:54+5:302021-07-07T16:27:52+5:30

Murder of 25 year man in mahur: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात भोसकला सुरा

25 year man murdered by his brother in mahur, nanded | नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

googlenewsNext
ठळक मुद्देक्षुल्लक वादाचे हाणामारीत रुपांतर झालेपोलिसांनी आरोपीस तातडीने अटक केली

माहूर (जि.नांदेड) : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात सख्ख्या भावानेच पोटात सुरा भोसकून खुन केल्याची घटना तालुक्यातील दत्तमांजरी येथे (दि.6) जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली. माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे रामेश्वर बाबूलाल जाधव व ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव या दोन सख्ख्या भावात 6 जुलै रोजी वाद झाला होता. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले आणि आरोपी रामेश्वर बाबूलाल जाधव (वय-27) याने रागाच्या भरात त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव (वय-25) याच्या पोटात सुरा भोसकला. 

रक्तस्त्राव सुरु झाल्याने जखमी ज्ञानेश्वर बाबूलाल जाधवला गावातील लोकांनी उपचारासाठी माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, तिथे गेल्यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.एन.भोसले, वैद्यकीय अधिकारी  डॉ.विजय मोरे यांनी ज्ञानेश्वर जाधव यास मृत घोषित केले. दत्तमांजरी येथील अक्षय उत्तम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलीस ठाण्यात आरोपी रामेश्वर बाबूलाल जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, पो.हे.कॉ.बाबू जाधव, पो.हे.कॉ.आनंदराव राठोड, पो.कॉ. साहेबराव सगरोळीकर, पो.कॉ. गोपीचंद राठोड, पो.कॉ.गजानन इंगळे पो.कॉ.आशिष डगवाल यांच्या चमूने आरोपीस तातडीने अटक केली. उपविभागिय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title: 25 year man murdered by his brother in mahur, nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.