युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:48+5:302021-04-18T04:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य याचा वस्तुपाठ नव्या पिढीपुढे सादर करणारे ...

Young Sivakathakar Dr. Sumant Tekade dies due to corona | युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य याचा वस्तुपाठ नव्या पिढीपुढे सादर करणारे प्रख्यात युवा शिवकथाकार डॉ. सुमंत दत्ता टेकाडे (३८) यांचे कोरोना संक्रमणामुळे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानामुळे ते युवा वर्गात अतिशय लोकप्रिय होते.

बेंगळुरू येथून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुमंत विप्रोच्या मानव संसाधन विभागात कार्यरत होते. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे प्रेम स्वस्थ बसू देत नसल्याने नोकरी सोडून ते प्रचारक झाले व नंतर व्यवस्थापन विषयात आचार्य पदवी संपादन करून ते एस.पी. जैन महाविद्यालयात काही काळ विभागप्रमुख होते. तीही नोकरी सोडून त्यानी शिवराय व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व व्यवस्थापनाशी निगडित इतर विषय यावर भाषणे देऊन समाजप्रबोधन करण्याचे व्रत अंगीकारले. त्यांचे राज्य आणि परराज्यातील कार्यक्रम लक्ष वेधून घेत होते. त्यांचे आजोबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाष्यकार मा.गो. वैद्य आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे त्याना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

लवकरच त्यानी लिहिलेल्या पुस्तकाचे व लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच काळाने घाव घातला व एका समाजभिमुख व्यक्तित्वचा अंत झाला.

ते नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी दत्ता टेकाडे यांचे पुत्र होते. त्यांचे मागे पत्नी माधवी, दोन मुले आणि आई व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

.....

Web Title: Young Sivakathakar Dr. Sumant Tekade dies due to corona