नायलॉन मांजाने युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:10+5:302021-01-13T04:16:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुचाकीने जात असलेल्या एका युवकाचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला. ही घटना रविवारी इंदोरा ...

Young man injured by nylon cat | नायलॉन मांजाने युवक जखमी

नायलॉन मांजाने युवक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दुचाकीने जात असलेल्या एका युवकाचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला. ही घटना रविवारी इंदोरा परिसरात घडली. गळा चिरल्याने युवक रक्तबंबाळ झाला. नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

राहुल काशीनाथ बोडके (२२) रा. ओमसाई नगर कळमना असे जखमी युवकाचे नाव आहे. राहुल जरीपटका येथे गॅस, कुकर, शेगडी रिपेअरिंगचे काम करतो. आपले काम संपवून तो आपल्या घरी दुचाकीने जात होता. दुपारी २ वाजताच्या सुमारास इंदोरा मैदान समोर अचानक त्याच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. मांजा अडकताच त्याने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे गाडी स्लीप झाली. यात मांजामुळे गळा चिरल्या गेला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या युवकाला परिसरातील नागरिकांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला २५ टाके लावण्यात आले. तेथून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अमरावतीला खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Young man injured by nylon cat