तरुणाची स्वत:ला जाळून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST2021-07-24T04:07:39+5:302021-07-24T04:07:39+5:30

कामठी : तरुणाने त्याच्या घरी कुणीही नसताना स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना कामठी शहरात गुरुवारी (दि. २२) ...

Young man commits suicide by burning himself | तरुणाची स्वत:ला जाळून घेत आत्महत्या

तरुणाची स्वत:ला जाळून घेत आत्महत्या

कामठी : तरुणाने त्याच्या घरी कुणीही नसताना स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना कामठी शहरात गुरुवारी (दि. २२) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

मुंताझिर हुसेन मकबुल हुसेन (३०, रा. बकराकामेला, कादर झेंडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. घरी कुणीही नसताना त्याने स्वत:ला खाेलीत काेंडून घेतले. त्यानंतर घरातील स्वयंपाकाचा गॅस स्वत:कडे करीत स्वत:ला जाळून घेतले. घरातून धूर निघत असल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी दार ताेडून आत बघितले असता ताे १०० टक्के भाजला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by burning himself