शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

यंदा फटाक्यांची ३० कोटींची उलाढाल!

By admin | Updated: November 5, 2015 03:48 IST

बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ

नागपूर : बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी सात दिवसांवर आली असून सध्या फटाकेप्रेमींचा खरेदीचा जोर कमी असला तरीही शनिवारपासून विक्री वाढणार आहे. विक्रीचा तंतोतंत आकडा सांगणे कठीण आहे. पण नागपुरात फटाके बाजारात यंदा ३० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याची माहिती होलसेल फटाके विक्रेते चांडक यांनी दिली. आतषबाजीवर नियंत्रण येणार४यंदा दिवाळीत महागाईमुळे नागरिकांना बजेट सांभाळत फटाक्यांची खरेदी आणि आतषबाजीवर नियंत्रण ठेवावे लागेल. फटाक्यांची बाजारपेठ ही केवळ १० दिवसांची असते. नागपुरात १० ते १२ होलसेल व्यापारी आणि हजाराच्या आसपास किरकोळ व्यापारी आहेत. शिल्लक असलेले फटाके त्यांना वर्षभर विकावे लागतात, अशी प्रतिक्रिया महाल येथील व्यावसायिक तन्वीर अहमद यांनी दिली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आनंद लुटता यावा म्हणून यंदा बाजारात फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात आहेत. नागपुरात ९० टक्के फटाके तामिळनाडूच्या शिवाकाशी येथून येतात. रंग बदलणारे फुलपाखरू, मॅजिक व्हिप, सायरन कुंडी, गंगा जमुना, मेरी गो राऊंड, म्युझिकल एरियल, लाल रंगाच्या सुरसुऱ्या हे नवीन फटाके विक्रीसाठी आहेत. नागपुरात तयार होणाऱ्या मडक्यातील अनाराला जास्त मागणी आहे. त्याची पूर्वीच नोंदणी करावी लागते. मॅजिक व्हिप, सायरन कुंडी, बटरफ्लाय फटाक्यांना बच्चेकंपनीकडून मागणी असते. खास फटाक्यांमध्ये फुलझडी, तुकडा, डिलक्स चोरसा, सापगोळी, बॉम्ब, फ्लॉवर पॉट, धमाका, पेन्सिल, धुवा स्मोक आदी फटाके बाजारपेठेत विक्रीस आहेत. प्रदूषणमुक्त फटाके४यंदा बाजारात क्रेकडोवा, मॅजिक साप, मल्टीकट, आयटम, रंगीत फुलझडी व रंगीत फॅन्सी अनार इत्यादी नवीन प्रदूषणमुक्त फटाके बालकांकरिता उपलब्ध झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. यंदा प्रदूषणमुक्त फटाके बाजारात उपलब्ध झाल्याने बालकांचा आनंद द्विगुणित तर झालाच तसेच प्रदूषणमुक्त फटाके फोडल्याने वातावरणात प्रदूषण निर्माण होणार नाही आणि पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही, हे विशेष. फटाक्यांना वर्षभर मागणी४कोणत्याही समारंभात आतषबाजी करण्याची हौस सध्या वाढीस लागली आहे. सर्वांची खरेदी हजारात असते. काही जण आॅर्डर देऊन माल खरेदी करतात तर अनेक जण उपलब्ध फटाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे किरकोळ विक्रेते विलास समर्थ म्हणाले. वर्षभर होणारी फटाक्यांची उलाढाल कोटींच्या घरात असते.रॉकेटला सर्वाधिक मागणी४मोठ्या आवाजाच्या फटाक्यांसह आकाशात रंगबेरंगी प्रकाशाने उजाळा देणाऱ्या रॉकेटला सर्वाधिक मागणी असते. प्रति रॉकेट १० ते १५० रुपये दरात असून १० च्या पॅकमध्ये आहेत. यामुळे शरीराला इजा होत नाही. यासह अनार फटाका महिलांमध्ये प्रचलित आहे. आकाशात उडणाऱ्या रंगबेरंगी फवाऱ्याचा आनंद लहानांपासून वयस्कांपर्यंत लुटतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनारला जास्त मागणी राहील, असे विक्रेते श्रीकृष्ण गोयल यांनी सांगितले.