शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कागदावरच

By admin | Updated: November 19, 2015 03:24 IST

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाद्वारे अनेक योजना राबविण्यात येतात. परंतु उदासीन प्रशासन आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या योजना कागदावरच राहतात.

पाच वर्षांत एकाही भटक्याला घरकू ल नाही : मिळालेला निधीही इतरत्र वळविलामंगेश व्यवहारे नागपूरआर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाद्वारे अनेक योजना राबविण्यात येतात. परंतु उदासीन प्रशासन आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या योजना कागदावरच राहतात. यातीलच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ही सुद्धा एक योजना आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भटक्या विमुक्त घटकांसाठी सरकारने २०११ मध्ये ही योजना सुरू केली होती. दरवर्षी बजेटमध्ये योजनेसाठी तरतूदही होत होती. राज्यात १ कोटी २७ लाख लोकसंख्या असतानाही एकाही भटक्याला योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावण्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. सतत सहा महिने स्थलांतर करणारे भटके कुटुंब याचे लाभार्थी होते. जे भटके कुटुंब तांड्यामध्ये, पाड्यामध्ये पाल टाकून राहतात, त्यांच्यासाठी गावातच वसाहत स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटाचे घर बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. याकरिता राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये विमुक्त भटक्यांची लोकसंख्या असलेली प्रत्येकी तीन गावांची निवड करून प्रत्येक गावातील २० कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार होता. योजनेसाठी २०११-१२ या आर्थिक वर्षात २० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पहिल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात येणार होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील तीन गावांची निवड योजनेसाठी होणार होती. दरवर्षी राज्यात भटक्यांसाठी ९९ वसाहती तयार होणार होत्या. अडीच एकर जमिनीवर बनविण्यात येणाऱ्या वसाहतीमध्ये २० घरकुलाचा समावेश होता. यात पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सेवा देण्यात येणार होत्या. तसेच रोजगाराच्या संधी, कम्युनिटी हॉल व पुनर्वसनाच्या योजना राबविण्यात येणार होत्या. परंतु गेल्या पाच वर्षांत ना वसाहत निर्माण झाली, ना भटक्यांना घरकूल मिळाले. योजनेची ही स्थिती भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणाऱ्या संघर्ष वाहिनीच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात उघडकीस आली आहे तरीही दरवर्षी या योजनेसाठी ८ ते १० कोटी रुपये निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यात येत आहे. राज्यात १ कोटी २७ लाख भटक्या विमुक्तांची लोकसंख्या असतानाही, एकाही कुटुंबाला योजनेचा लाभ झालेला नाही. यासंदर्भात संघर्ष वाहिनीने मागासवर्गीय आयोगाकडे याचिका दाखल केली होती. यावर आयोगाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी शिफारस आयोगाने सरकारला केली. परंतु आयोगाच्या शिफारशीकडेही लक्ष दिले नाही. २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात भटक्या विमुक्तांनी मोर्चा काढून सामाजिक न्यायमंत्र्यांकडे घरकुलाची मागणी केली. परंतु निवेदन स्वीकारून मंत्र्यांनी वर्षभरात काहीच केले नाही. (प्रतिनिधी)