शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

घणाचे घाव घालून पत्नी, मुलगा, सुनेची हत्या

By admin | Updated: May 13, 2014 00:20 IST

कौटुंबिक वादातून संतापलेल्या वृद्धाने सोमवारी पहाटे ५.३0 वाजता घणाचे घाव घालून वृद्ध पत्नी, मुलगा व सुनेला ठार केले. या निर्घृण हत्याकांडाने गावासह परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आरोपी पित्यास अटक : गावात तणावपूर्ण शांतता

गोरेगाव (जि. गोंदिया) : कौटुंबिक वादातून संतापलेल्या वृद्धाने सोमवारी पहाटे ५.३0 वाजता घणाचे घाव घालून वृद्ध पत्नी, मुलगा व सुनेला ठार केले. या निर्घृण हत्याकांडाने गावासह परिसरात एकच खळबळ माजली आहे. रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पित्याने पळ काढला होता. हत्याकांडातील मृतांची नावे बिरनबाई पांडुरंग अगडे (५७), छन्नालाल पांडुरंग अगडे (३७) व योगेश्‍वरी छन्नालाल अगडे (३२, रा. गोरेगाव) अशी आहेत.

आरोपी पांडुरंग अगडे (६२) याला शेतात आलेले गहू विकायचे होते. त्यास पत्नी बिरनबाई व मुलगा छन्नालाल यांचा विरोध होता. त्यावरून चार-पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग पांडुरंग मनात धरून होता. त्यातून त्याने सर्वजण झोपेत असताना सोमवारी पहाटे प्रथम मुलगा छन्नालालवर घणाचे घाव घालून करून जखमी केले. मुलाच्या ओरडण्याने बिरनबाई उठली. तिने सून योगेश्‍वरीच्या मदतीने पांडुरंगला विरोध केला असता रागाने बेभान झालेल्या पांडुरंगने त्यांच्यावरही घणाचे घाव घालून हल्ला चढविला. तो एवढय़ावरच न थांबता त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नी व सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्नही केला.

माय-लेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावले असता पांडुरंग घराबाहेर पळाला. घडलेल्या प्रकाराबाबत शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना घरात तिघे जखमी अवस्थेत आढळून आले. घरातील दृष्य भयावह होते. गावकर्‍यांनी जखमींना उपचाराकरिता गोंदिया येथे हलविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, रस्त्यातच बिरनबाईंचा मृत्यू झाला. सून योगेश्‍वरीने उपचारापूर्वीच रूग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. मुलगा छन्नालालची प्रकृती अधिक गंभीर असल्याने नागपूरला पाठविण्यात आले. मात्र नागपूरला जाताना त्यानेही वाटेतच प्राण त्यागला.

या तिहेरी हत्याकांडाची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरली. पांडुरंगविरोधात गावकरी चिडले. गावातले वातावरण भडकू नये, म्हणून पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला मोठय़ा शिताफीने अटक केली. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३0२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रवीन्द्र शिंदे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)