शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:18 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देकार्डिओलॉजी विभाग : विना शस्त्रक्रिया हृदयाच्या धमणीवरील फुग्यावर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका ५२ वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या धमणीला मोठा फुगा निर्माण झाला होता. हा फुगा बाजूच्या फुफ्फुसात जाऊन फाटत होता. यामुळे रुग्णाला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. अशा रुग्णांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’हाच पर्याय आहे. परंतु गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व दगावण्याची भीती असल्याने रुग्णाने नकार दिला होता. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी या रुग्णावर विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. त्या रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील ५२ वर्षीय शंकर (नाव बदललेले आहे) नावाचा रुग्ण ८ ऑगस्ट रोजी रक्ताच्या उलट्या होतात म्हणून मेडिकलच्या टीबी वॉर्डात भरती झाला. त्यांचा एक्स-रे व सिटी स्कॅन काढला असता उजव्या बाजूच्या हृदयाच्या धामणीला पाच बाय सहा सेमी.चा मोठा फुगा निर्माण झाल्याचे निदान झाले. हा फुगा फुफ्फुसामध्ये जाऊन फाटत असल्याने रुग्णाला रक्तस्राव होत होता. शंकर यांना ‘ओपन हार्ट सर्जरी’चा सल्ला देण्यात आला होता. परंतु ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने व २० टक्के रुग्ण दगाविण्याची भीती असल्याने त्यांनी शस्त्रक्रियेस नकार दिला. शंकर यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात पाठविण्यात आले. येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पी. पी. देशमुख यांनी त्यांची तपासणी केली. उपचाराचे नियोजन केले. जे ‘डिव्हाईस‘ ‘पीडीए’ नावाचा हृदयातील छिद्र बुजविण्यासाठी वापरले जाते, त्याचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. डॉ. देशमुख यांनी अ‍ॅन्जिओग्राफी करीत त्याच ‘डिव्हाईस’च्या मदतीने हृदयाच्या धमणीवरील फुग्याचे तोंड बंद केले. या शस्त्रक्रियेत त्यांचे कौशल्य व अनुभव महत्त्वाचे ठरले. यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांचे प्राण वाचले. ते बरे होऊन ३ सप्टेंबरला आपल्या घरीही गेले. या शस्त्रक्रियेत डॉ. देशमुख यांना डॉ. संदीप चौरसीया व डॉ. महेंद्र मस्के यांनी मदत केली. शस्त्रक्रियेत कॉर्डिओलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे व डॉ. सुनील वाशिमकर यांनीही मार्गदर्शन केले.‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, अशा पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया आतापर्यंत तरी कुठे वाचण्यात आलेली नाही, किंवा अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेचा कुठे उल्लेखही नाही. म्हणूनच ही शस्त्रक्रिया जगातील पहिली असावी.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHeart Diseaseहृदयरोग