शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराची हत्या की आत्महत्या?

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

कंत्राटी कामगाराने गळफास लावून गुरुवारी कंपनीत आत्महत्या केली. या घटनेस तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांच्या तपासाला गती आली नाही.

गूढ अद्याप कायम : बुटीबोरीत विविध चर्चेला उधाणबुटीबोरी : कंत्राटी कामगाराने गळफास लावून गुरुवारी कंपनीत आत्महत्या केली. या घटनेस तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांच्या तपासाला गती आली नाही. दुसरीकडे मृताच्या वडिलांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याचे गूढ वाढत चालले आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा केली जात असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रफुल्ल गौतम कोसारे (२५, रा. वॉर्ड क्रमांक - ५, व्हिडीओ चौक, बुटीबोरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रफुल्ल हा बुटीबोरी एमआयडीसी परिसरात इंडोरामा कंपनीतील इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटमध्ये ३ ते ४ वर्षांपासून कार्यरत होता. तो बुधवारी (दि.३०) दुपारी २.३० ते रात्री १०.३० या पाळीत कामाला आला होता. त्यानुसार रात्री १०.३० वाजता काम संपल्यानंतर घरी जायला पाहिजे होता. या कंपनीत अंदाजे १२०० कंत्राटी कामगार काम करतात. त्यांच्यावर नियंत्रण वा लक्ष ठेवणे हे सुपरवायझरचे काम आहे. परंतु गुरुवारी (दि.३१) सकाळच्या सुमारास प्रफुल्ल लोखंडी अ‍ॅगलला गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कंपनीत कार्यरत कामगार गळफास लावतो मात्र ते कुणालाही दिसत नाही, यामुळे या प्रकरणात काही रहस्य दडले असावे, अशी नागरिकांत चर्चा आहे.दुसरीकडे कंपनीतील कामगारांना कामावरुन कमी करणे सुरू आहे. पुरेशा सुविधा न देणे, असा गंभीर आरोप काहींनी केला आहे. कंपनीतील कामाच्या वाढत्या ताणामुळे कंटाळल्याने कामगार असा मार्ग पत्करतील काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच प्रफुल्ल नियमित कामावर असतानादेखील त्याच्या कामाबाबत मस्टर कार्डवर १५ ते २० दिवसांपासून गैरहजर दाखविले असल्याची कामगारांत चर्चा होती. घटनेदरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने प्रफुल्लच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रेटून धरली. परंतु कार्यकर्त्यांनी तोडफोड केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र कंपनीच्या आत कामगार गळफास लावतो, त्यावर कंपनी व्यवस्थापनावर कुठलीही कारवाई का नाही, असा प्रश्न कामगार उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)चौकशीची मागणीमृताचे वडील गौतम कोसारे यांनी बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये प्रफुलने कंपनीत गळफास लावला नसून त्याची हत्या केली असल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गौतम कोसारे यांनी केली आहे.