शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

नागपूर जिल्हा परिषदेत महिला राज : सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 9:51 PM

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांसह तीन सभापतिपदी महिलाच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे. पदाधिकाऱ्यांमध्येही पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त वाटा मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असल्याने, रश्मी बर्वे यांच्या रूपात महिला अध्यक्ष मिळाल्या. पण इतर चार विषय समितींपैकी तीन समितीच्या सभापती पदावर महिलाच विराजमान झाल्या.५८ सदस्यसंख्या असलेल्या नागपूर जि.प.मध्ये यंदाच्या निवडणुकीत एकूण ३१ महिला निवडून आल्या आहेत. अध्यक्षानंतर समाजकल्याण, महिला व बालकल्याण व इतर दोन सभापती पदासाठी निवडणूक झाली. समाजकल्याण सभापती पद हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते, तर महिला व बालकल्याण हे सभापतिपद महिला सदस्यासाठी राखीव होते. तर इतर दोन विषय समितीची सभापती पदेही खुल्या प्रवगार्तील सदस्यांसाठी राखीव होते. या चारही विषय समिती सभापतींपैकी तीन महिला सदस्यांची सभापती म्हणून निवड झाली.सहा पदाधिकारी संख्या असलेल्या जि.प.मध्ये चार पदांची जबाबदारी महिला सांभाळणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांची संख्या जास्त असण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचेच वर्चस्व असल्याने जि.प.मध्ये आता महिला ‘राज’ राहणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरWomenमहिला