शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: May 29, 2025 22:09 IST

मध्यरात्रीनंतर न्यायालयासमोर सुनावणी, दिवसभर चालली चौकशी : नोकरीसाठी पाकिस्तानात गेल्याचा दावा

योगेश पांडे नागपूर : कारगिलमधील हुंदरमन गावाजवळ नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणारी सुनीता गटलेवार हिने देशाविरोधात हेरगिरी केल्याचा सुरक्षायंत्रणांना संशय आहे. त्याआधारे तिच्याविरोधात अमृतसर ग्रामीणमधील घरिंडा पोलिस ठाण्यात झीरो एफआयआरची नोंद करण्यात आली होती. ते प्रकरण नागपुरात वर्ग करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर तिला नागपुरात आणल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गुरुवारी दिवसभर तिची चौकशी करण्यात आली.

पाकिस्तानातील एका धर्मगुरूला भेटण्यासाठी नागपुरातील ४३ वर्षीय सुनीता ही कारगिलमधील नियंत्रण रेषा ओलांडून गेल्यामुळे खळबळ उडाली होती. ती एलओसी ओलांडत असतानाच पाकिस्तानी रेंजर्सने तिला पकडले होते. त्यांनी तेथे तिची चौकशी केली होती व ध्वजबैठकीदरम्यान तिला बीएसएफच्या हवाली केले. मागील काही काळापासून ती पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत चॅटिंग करत होती हे तिच्या मोबाइलमधून स्पष्ट झाले. सुनीताचा मुलगा सध्या कारगिल बॉर्डर येथे चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या कस्टडीत आहे. बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

तेथे त्यांनीदेखील तिची चौकशी केली. कपिलनगर पोलिस ठाण्यातील एक अधिकारी, दोन महिला कर्मचारी व आणखी एक कर्मचारी तिचा ताबा घेऊन गुरुवारी मध्यरात्री तिला नागपुरात घेऊन पोहोचले. कपिलनगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात ऑफिशियल सिक्रेट ॲट्सअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिला रात्रीच मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले व तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिच्याकडून पोलिसांनी मोबाइल, आधारकार्ड, व्होटर आयडी, पासपोर्ट जप्त केले आहे, अशी माहिती उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.

मोबाइलचा डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न

महिलेने तिच्या मोबाइलमधील चॅटिंग व इतर डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी सायबरतज्ज्ञांच्या हवाली करण्यात आला आहे. तिच्या मोबाइलमधील डेटा व तिच्या अमृतसरमधील बयाणाची पडताळणी करण्यात येणार आहे. मोबाइलचे सखोल विश्लेषण करण्यात येत आहे व डेटा रिकव्हरी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. इतर तपास यंत्रणादेखील तिच्या चौकशीत सहभागी होणार आहेत.

सुनीताचा दावा, पैसे संपल्याने पोहोचली पाकिस्तानात

मुलाला बर्फ दाखविण्यासाठी कारगिलला घेऊन गेल्याचा दावा सुनीताने पोलिसांच्या चौकशीदरम्यान केला. मात्र तेथे पैसे संपले व नोकरी शोधायला लागली. नोकरी शोधण्याच्या नादात ती पाकिस्तानात गेली असा दावा तिने केला आहे. तिचा १२ वर्षांचा मुलगा अजूनही कारगिलमधील बालकल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात आहे. तिचा मुलगा परत आल्यावर पोलिस आणखी सत्यता पडताळतील. सोशल माध्यमांतून पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क असल्याचे तिने मान्य केले. मात्र, व्यावसायिक कारणांमुळे हा संपर्क होता असा दावा तिने केला आहे. कपिलनगर पोलिस ठाण्यातील पथकाने याबाबत गुरुवारी तिची सखोल चौकशी केली. तिच्या काही दाव्यांमध्ये विरोधाभास समोर आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.