पाण्याच्या टाक्यात पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:21+5:302020-12-02T04:09:21+5:30

लोकमत न्युज नेटवर्क उमरेड : पाणी साठवणूक करण्याच्या टाक्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील बहिणाबाई नगर येथे ...

Woman dies after falling into water tank | पाण्याच्या टाक्यात पडून महिलेचा मृत्यू

पाण्याच्या टाक्यात पडून महिलेचा मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क

उमरेड : पाणी साठवणूक करण्याच्या टाक्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील बहिणाबाई नगर येथे साेमवारी (दि. ३०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

संगीता जगन गावंडे (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी मृत संगीताचा पती जगन गावंडे झोपेतून उठले असता पत्नी घरी दिसली नाही. त्यांनी घराबाहेर शोध घेतल्यानंतर आवारात असलेल्या नळाच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडेच होते. शोध घेतला असता पत्नी टाक्यात पडून होती. लागलीच तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. भिवापूर तालुक्यातील वासी येथील सरपंच जगन गावंडे यांच्या त्या पत्नी होत्या. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Woman dies after falling into water tank