शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

राज्यनिर्मितीशिवाय विदर्भाचे भले नाही : श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 8:43 PM

विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीच्या चौथ्या वर्धापन दिनी विदर्भ राज्यनिर्मितीचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आघाडीचा चौथा वर्धापन दिन आंध्र असोसिएशन सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. श्रीहरी अणे होते. कार्याध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, पूर्व विदर्भ विभाग प्रमुख अनिल जवादे, सचिव अमोल कठाणे, महासचिव संजय नेरकर, अमोल बोरखडे, सुरेश पारधी, वैभव लोणकर, श्रीकांत थुलकर, इर्ले गुरुजी, मेघा उताणे आदी उपस्थित होते.अ‍ॅड. अणे म्हणाले, सत्ताप्राप्तीसाठीच या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. कारण सामाजिक बदलासाठी आणि विदर्भाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी हाच मार्ग आहे. निव्वळ आंदोलनाने बदल होणार नाही. आंदोलनाचे परिवर्तन पक्षात करा. पक्ष केवळ निवडणुकीपुरता नसून वर्षभर आंदोलनाच्या रूपाने काम करीत राहील. मैदानात अनेक जुने पक्ष आहेत. त्यामुळे चार वर्षापूर्वी स्थापन झालेला पक्ष जिंकणार की नाही याचा विचार करू नका. आंदोलनासाठी आपल्याला लढावेच लागेल, असे आवाहन त्यांनी केले. रक्तरंजित आंदोलन, जाळपोळ यातून विदर्भनिर्मिती नको. ज्याच्या घरचा तरूण मुलगा जातो, त्यांनाच त्याचे दु:ख ठाऊक असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपला लढा व्यापक करा.नीरज खांदेवाले म्हणाले, २०१४ मध्ये विदर्भ राज्यनिर्मितीचे नाव घेऊन सत्तेत आलेले आज आश्वासन विसरले आहेत. विदर्भाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी सोबत घेतले आहे, यावरून त्यांच्या मनात विदर्भनिर्मितीबद्दल किती कळवळा आहे, हे समजून घ्यावे. अमेरिकेतील हाऊडी मोदी कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली.अनिल जवादे, प्रा.जोगेंद्र गवई, कविता उईके, रामकिशन सिंगनजुडे आदींची यावेळी भाषणे झाली. अ‍ॅड.अनिल गोवारदीपे, अ‍ॅड.आसिफ कुरेशी, अ‍ॅड.शैलेश नारनवरे, अ‍ॅड.आशुतोष पोतनीस, अ‍ॅड.अतुल पांडे, अ‍ॅड.अविनाश काळे यांच्यासह जागृत पालक समितीचा यावेळी सत्कार करण्यात आला. विदर्भभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.विदर्भनिर्मितीसह ११ ठरावस्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा यासह एकूण ११ ठराव यावेळी पारित करण्यात आले. विधानसभा निवडणुका इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरून व्हाव्या, विदर्भातील बंद कारखाने सुरू करून बेरोजगारी दूर करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ११० प्रतिबंधात्मक कलम रद्द करावे आदींचा यात समावेश आहे.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेVidarbhaविदर्भ