लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रच नाही तर कुठल्याही राज्यात कायदा व सुव्यवस्था सर्वांत महत्त्वाची असते. राज्यात नवीन सरकारचे गठण होताच, खुनाचे सत्र आणि सामाजिक परिस्थिती चिघळली आहे. अशावेळी गृहखात्याचा मंत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे, असा सवाल उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तांत्रिक आहे आणि त्याबाबत काय मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा करतो आहोत.