शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:28 IST

१९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे२४ ला विधानसभेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात टी १ अवनी नामक वाघिणीने धुमाकूळ घालत १३ गरीब आदिवासींचे बळी घेतले. तेथील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याने त्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र वन्यजीवप्रेमी नावाची जमात त्यावर वादंग माजवत असून, १३ गरीब आदिवासींचे बळी गेले तेव्हा ते कुठे होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वन्यजीवांचा लळा असणाऱ्यांनी स्वत: गावांमध्ये जाऊन अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. एका वाघाने शेतकऱ्याला ठार केले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी मोजक्या शिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी आठ दिवस जंगलात तळ ठोकला होता. याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वन्यजीव संरक्षण कायदा कुचकामी ठरला असून तो कायदा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, रुद्रा कुचनकार, अरुण वनकर, दिनकर दाभाडे उपस्थित होते.वीज कनेक्शन खंडित करण्याचा आदेश मागेकाही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकीत वीज बिलामुळे कृषिपंपधारकांचे कनेक्शन खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाने २० हजार कोटी रुपये दिले; शिवाय न्यायालयानेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करता येणार नाही, असा निर्णय दिला. ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी आपला आदेश मागे घेतला. मात्र शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी