शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीवर महोत्सव कशाला?

By admin | Updated: November 19, 2014 00:47 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत.

महापालिका : आधी रस्ते दुरुस्त करा, नंतर भव्यदिव्य समारंभ घ्यानागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत. असे असतानाही उसनवारीच्या पैशावर नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन कशाला असा प्रश्न शहरातील नागरिक ांना पडला आहे. निधी नसल्याने दोन वर्षापासून रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट रस्ते, कवीवर्य सुरेश भट सभागृह, उड्डाण पूल, लंडस्ट्रीट, नंदग्राम, पाणीपुरवठा अशा अनेक योजनांची कामे रखडलेली आहेत. मनपा तिजोरीत पैसा नसल्याने दर महिन्याला कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड जात असल्याने नवीन भरती नाही. याचा नागरी सुविधांवर परिणाम झाला आहे. असे असतानाही नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्याचा घाट पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. महापालिकेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी आयोजित कार्यक्रमासासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी न आल्याने हा कार्यक्र म पुढे ढकलण्यात आला. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे कार्यक्रम होऊ शकले नाही.निवडणुकीनंतर केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आले. त्यामुळे शासनाकडून व प्रायोजकांकडून निधी मिळेल या आशेने नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्याचा मनपाचा मानस आहे. महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्याम वर्धने यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यात महोत्सव दणकेबाज साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाला विरोध नाही. असे कार्यक्र म व्हायलाच हवे, पण यासाठी पैसाही लागतो. तिजोरीत पैसा असेल तर हरकत नाही. एलबीटीमुळे मनपाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच एलबीटी रद्द करण्याची भाजप नेत्यांनी घोषणा केल्याने जे व्यापारी एलबीटी भरणार होते, त्यांनीही आता एलबीटी भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महोत्सवासाठी शासनाकडे हात पसरावे लागतील. देणगीदारांचा शोध सुरू आहे. या पैशातून कलावंतांना कार्यक्र मासाठी निमंत्रित केले जाणार आहे. कर्ज घेऊन व देणगीच्या पैशातून सणवार साजरे करण्याचा हा प्रकार आहे. महोत्सवानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील अर्धमॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विख्यात तबलावादक झाकीर हुसेन, गायिका आशा भोसले, शंकर महादेवन, एहसान लॉय आदींना निमंत्रित केले आहे.(प्रतिनिधी)