शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

जय गेला कुठे ?

By admin | Updated: July 17, 2016 01:44 IST

त्याचा तो रुबाब, डौलदार शरीर आणि ऐटदार चाल. यामुळे पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील...

वन विभागाची शोधाशोध : रेडिओ कॉलर ‘फेल’ नागपूर : त्याचा तो रुबाब, डौलदार शरीर आणि ऐटदार चाल. यामुळे पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ हा वाघ अचानक गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवाय संपूर्ण वन विभाग अस्वस्थ झाला आहे. विशेष म्हणजे, हा वाघ मागील काही वर्षांपासून या अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या. एवढेच नव्हे, तर मुंबई-पुण्यावरून व्हीव्हीआयपी सुद्धा त्याला पाहण्यासाठी येथे येत होते. अशाप्रकारे ‘जय’ हा मागील तीन वर्षांत वाघांमधील ‘हिरो’ झाला होता. यातूनच वन विभागासमोर त्याच्या सुरक्षेचे एक आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे ‘जय’वर २४ तास नजर ठेवता यावी यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी लाखो रुपये खर्च करून, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मदतीने ‘जय’ला रेडिओ कॉलर लावली. मात्र दोनच महिन्यात म्हणजे, २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ती रेडिओ कॉलर बंद पडली. यानंतर १८ मार्च २०१६ रोजी त्याला पुन्हा दुसरी नवीन रेडिओ कॉलर लावण्यात आली. परंतु अवघ्या महिनाभरात ती सुद्धा बंद पडली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, तो याच काळापासून अचानक गायब झाला. काही जाणकारांच्या मते, ८ मे २०१६ रोजी तो ब्रम्हपुरी येथील जंगलात आढळून आला. परंतु त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. वन विभाग त्याचा कसून शोध घेत आहे. त्याचवेळी वन विभागातील काही अधिकारी उमरेड-कऱ्हांडला या जंगलात वाघांची (नर) संख्या वाढल्याने ‘जय’ने आपल्या नवीन अधिवासाच्या शोधात हे जंगल सोडल्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. परंतु त्याचवेळी काही जाणकार ‘जय’ हा एवढ्या सहजासहजी आपले जंगल सोडून दुसरीकडे जाणारा प्राणी नाही, असा दावा करीत आहे. त्यामुळे ‘जय’सोबत काही घातपात तर झाला नाही ना! अशी भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) घातपाताची भीती वन विभागाने ‘जय’ला दोनदा रेडिओ कॉलर लावली. पण ती दोन्ही वेळा बंद पडली. यावर वन विभागाने त्या दोन्ही रेडिओ कॉलर बंद का पडल्या याचा शोध घेऊन पुढील उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु संबंधित वन अधिकाऱ्यांकडून तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाही. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये ‘जय’विषयी जेवढे आकर्षण वाढले होते, तेवढाच या जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये त्याच्याविरुद्ध रोष भडकला होता. त्यामुळे ‘जय’ची सुरक्षा ही वन विभागापुढील एक आव्हान होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. संबंधित वन अधिकारी तो उमरेड-कऱ्हांडला सोडून गेल्याचा दावा करीत असले, तरी त्याच्याविरुद्ध परिसरातील लोकांच्या मनातील रोष पाहता, ‘जय’सोबत घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक ‘जय’ निघून गेला ‘जय’ हा मागील २०१३ दरम्यान नागझिरा येथून उमरेड-कऱ्हांडला जंगलात आला होता. मात्र तेव्हापासून तो सतत आत-बाहेर होत होता. महिन्यातील १५ दिवस तो ब्रम्हपुरी जंगलात जायचा. शिवाय २०१३-१४ पर्यत येथे त्याच्या तोडीला एकही वाघ (नर) नव्हता. त्यामुळे तो खुलेआम सहज वावरत होता. परंतु गत दोन वर्षांत येथे नवीन सात वाघ तयार झाले आहे. त्यामुळे एवढ्या वाघांना उमरेड-कऱ्हांडला जंगालचे क्षेत्र कमी पडत आहे. यातूनच ‘जय’ हा नवीन अधिवासाच्या शोधात निघून गेला आहे. विशेष म्हणजे, या जंगलात केवळ दोन वाघांच्या (नर) अधिवासाएवढेच वनक्षेत्र आहे. त्यामुळे भविष्यात येथील पुन्हा काही वाघ बाहेर जाऊ शकतात. ‘जय’ हा इतर दुसऱ्या वाघांच्या तुलनेत अधिक जनावरांची शिकार करीत होता, हे खरं आहे. मात्र यातून त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असे वाटत नाही. -एम.एस. रेड्डी, क्षेत्र संचालक-पेंच व्याघ्र प्रकल्प.