लाचखोरांचा ‘निकाल’ कधी लावणार ?

By Admin | Updated: June 3, 2015 02:35 IST2015-06-03T02:35:08+5:302015-06-03T02:35:08+5:30

राज्यात नागपूर परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयांमध्ये लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

When will the 'ridiculous' results of the bribe? | लाचखोरांचा ‘निकाल’ कधी लावणार ?

लाचखोरांचा ‘निकाल’ कधी लावणार ?

राहुल अवसरे नागपूर
राज्यात नागपूर परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयांमध्ये लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही माहिती राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या अहवालात दिली आहे. राज्यातील विविध न्यायालयांमध्ये ३२५१ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबनाचा काळ १९८६ पासूनचा आहे.
यापैकी नागपूर परिक्षेत्रातील न्यायालयांमध्ये ५६३ (१७.३१ टक्के), त्याखालोखाल पुणे परिक्षेत्रात ४७७ (१४.६७ टक्के), नाशिक ४४३ (१३.६२), ठाणे ४४२ (१३.५९ टक्के), औरंगाबाद ४३९ (१३.५० टक्के), अमरावती ३८३ (११.७८ टक्के), नांदेड ३३३ (१०.२४ टक्के) आणि मुंबई परिक्षेत्रात १७१ (५.२५ टक्के) प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर परिक्षेत्रातील न्यायालयांमधील एकूण प्रलंबित प्रकरणांपैकी नागपुरात २१३, वर्धा येथे ५८, भंडारा ७४, गोंदिया ३७, चंद्रपूर ११९, वरोरा २५ आणि गडचिरोली येथील न्यायालयात ३७ प्रकरणे आहेत.

 

Web Title: When will the 'ridiculous' results of the bribe?