शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

खरे गणतंत्र कधी मिळणार?

By admin | Updated: January 26, 2015 01:04 IST

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही

काश्मिरी तरुणांचा देशाला सवाल नागपूर : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही कमी व्हायचे नाव घेत नाही़ रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन आजही सुरूच आहे़ सीमेपलीकडून आलेल्या गोळीने जीव गमावणाऱ्यांच्या मुलांचा जगण्याचा संघर्षही थांबलेला नाही़ बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे हे नंदनवन शांत झाले असा एक विचार मनात येतो अन् पुढच्याच क्षणी उखळी तोफांचे गोळे घराच्या भिंतीवर धडकायला लागतात़ जीवन अन् मृत्यूच्या अशा सीमारेषेवर राहणारे काही तरुण नागपुरात आले आहेत. त्यांच्याशी लोकमतने विशेष संवाद साधला. आजच्या या प्रजासत्ताकदिनी आमच्या स्वप्नातील गणतंत्र कधी मिळेल, असा प्रश्न ते विचारत आहेत़ स्वातंत्र्याच्या अर्थ मनमानी नव्हे! भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. पण याचा अर्थ मनात येईल तसे वागा असा होत नाही़ प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना, आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. -जाहिद भटप्रतिशोधाची भावना हद्दपार व्हावीआकाशात उंच भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे सर्व क्षेत्रात प्रगतीकडे घोडदौड करू पाहणारा युवक हा राष्ट्राचा अनमोल ठेवा मानला जातो. राष्ट्राची संपत्ती मानली जाते. आज आपल्या देशातील तरुण आपल्याच देशातील बंधूवर सूड उगवायला निघाला.-रिक्झेन चंडोलराष्ट्राभिमानाचा विसर नकोदेशाच्या सीमेवर निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिकांविषयी आमच्यासारख्या तरुणवर्गाला आत्मियता वाटत असली, तरी मात्र आम्ही एक दिवस का होईना त्यांच्या सुखदु:खात सामील व्हायला मागे-पुढे पाहतो. यास नवी संस्कृती व तिचे अनुकरण करणारे आपण कारणीभूत आहोत. या संस्कृतीच्या अनुकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत.-जोगिंदर सिंहप्रत्येक दिवस गणतंत्रदिन असावा केवळ स्वातंत्र दिन, गणराज्य दिन अशा दिवशीच राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान जागृत न करता उगवणाऱ्या प्रत्येकच दिवशी देशाप्रति, राष्ट्राप्रति आपुलकी बाळगली पाहिजे. युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आजच्या युवकांमध्ये जल्लोष, गुर्मी, उर्मी, उन्माद, सळसळते रक्त, हिंमत, जोश हे प्रकर्षाने दिसून येतात. -स्टॅझिंग दोरेजेतरुणच आह देशाची शानसारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आज आपण विसरलो आहे. या देशाचे आज आपण असून उद्याचे भविष्य ठरविणारेही आपणच आहोत, याची जाण असू द्यावी. तरुण राष्ट्राची आन आहे अन् तोच राष्ट्राची शानही आहे! -रुबिना अफजल मीरसमाजाची अपेक्षा पूर्ण करातरुणांना आज चिंतन करण्याची गरज आहे़ नवे फॅशन, ट्रेन्ड, प्रेम, मजा, मस्तीतही आपल्यातील देशप्रेमाची भावना कायम राहिली पाहिजे़ युवक या देशाचा चमकता लखलखीत तारा आहे. या ताऱ्याच्या प्रकाशाने हा देश उजळून निघावा, अशी समाजाचीही भावना आहे़ ही भावना जपण्यासाठी आपल्या राष्ट्रभावना बोथट होऊ देऊ नका, ती उर्मी कायम ठेवा.-आशिक खान