शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

'शेतकऱ्यांचा सात-बारा कधी कोरा होणार? किमान कार्यक्रम जाहीर करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 1:49 PM

निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती

नागपूर : महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

महाराष्ट्राच्या प्रतिमेवर सरकारच्या धोरणांचा परिणाम होत आहे. गुंतवणुकदारांवर परिणाम होतोय. त्यामुळे सरकारने तात्काळ कामं सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावी. विशेष म्हणजे, सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जुगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून सरकारने हात वर करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती, तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता, त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चर्चेची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे. सावरकर यांचा त्याग राहुल गांधींना माहिती नाही, असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय. 

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfarmer suicideशेतकरी आत्महत्याRahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर