शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

By admin | Updated: June 6, 2017 02:09 IST

समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे.

उपराजधानीत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म : ६ वर्षांत आकडेवारी स्थिरचलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. ‘बेटी बचावो’ मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. दहावी, बारावीसह स्पर्धा परीक्षांतदेखील नागपुरातील मुलीच ‘टॉप’ असतात. मात्र तरीदेखील राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या ६ वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत नागपुरात किती मुलामुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१२ ते मार्च २०१७ या कालावधीत २ लाख ९६ हजार ५६७ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या १ लाख ५३ हजार १०९ इतकी होती तर मुलींचा आकडा १ लाख ४३ हजार ४५८ एवढा होता. सरासरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९३.६९ टक्के एवढे होते. दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत ९४.८३ टक्के मुलींचा जन्म झाला. इतर सर्व वर्ष टक्केवारी ही ९३ व ९४ टक्क्यांच्या मध्येच होती. २०१७ मध्ये मार्च महिन्यापर्यंत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म झाला.सव्वा वर्षात ३४८ उपजत मृत्यूदरम्यान, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत शहरात एकूण ३४८ उपजत मृत्यूची प्रकरणे आढळून आली. यात २०२ मुले व १४६ मुलींचा समावेश होता. सव्वा लाखांहून अधिक मृत्यूची नोंद२०१२ पासून सव्वा पाच वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ३३ हजार ७३८ मृत्यूची नोंद करण्यात आली. यात ८० हजार ५८२ पुरुष व ५३ हजार १५६ महिलांचा समावेश होता. २०१६ मध्ये सर्वाधिक २६ हजार ९२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.