शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना कधी मिळणार हक्काची घरे

By admin | Updated: November 4, 2015 03:17 IST

शहरातील गरिबांना हक्काची घरे मिळावी, सोबतच शहराचा चेहरामोहरा बदलावा, या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन

नागपूर : शहरातील गरिबांना हक्काची घरे मिळावी, सोबतच शहराचा चेहरामोहरा बदलावा, या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे बीएसयूपी घरकूल योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचे काम संथ असल्याने गरिबांना घरे कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील १७ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांसाठी ४ हजार ५५२ घरकुले या योजनेंतर्गत मंजूर झालेली आहेत. ही कामे डिसेबर २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु योजना राबविताना अडचणी येत असल्याने जेमतेम १२०० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना घरकुलासाठी वाट पहावी लागणार आहे.झोपडपट्टीत कच्चे बांधकाम करून अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना चांगली घरे मिळावी, तसेच येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. हा या योजनेमागचा हेतू आहे. काही भागात घरांचे बांधकाम करण्यात आले. परंतु काही झोपडपट्ट्यांमध्ये अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. इंदिरा मातानगर वस्तीतील नागरिकांनी त्यांच्या वस्तीत घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु अद्याप येथील घरांचे काम पूर्ण झालेले नाही. वांजरा येथे २१४ तर नारी येथे २३४ घरकुलांचे काम सुरू आहे. २०१५ या वर्षात घरकु लांचे बांधकाम होण्याची शक्यता नसल्याने या योजनेसाठी २०१७ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार ती देण्यात आली. काही ठिकाणी अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही. काही ठिकाणी गरजुंना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. पांढराबोडी येथे घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. परंतु घरकू ल वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, अद्याप याबाबतचा चौकशी अहवाल पुढे आलेला नाही.(प्रतिनिधी)तीन हजार घरे बांधल्याचा दावाशहरात तीन हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातील दोन हजार घरकुलांचे वाटप झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु नगरसेवकांनी याबाबतची माहिती जाहीर करण्याची मागणी सभागृहात केली आहे. प्रतिसाद नाहीकाही झोपडपट्टीधारकांच्या ताब्यात मोठी जागा आहे. मिळणारी घरे छोटी असल्याने अनेकांचा या योजनेला विरोध होता. त्यामुळे झोपडीधारकांना बांधकामासाठी अनुदान देण्याची मागणी पुढे आली आहे.